Shahrukh Khan Priyanka Chopra Mona Patel ready for Met Gala 2025
नवी दिल्ली :
शाहरुख खान डिझायनर सब्यसाचीचे कपडे घालून मेट गालामध्ये डेब्यू करणार आहे. तर दिलजीत दोसांझ, देसी गर्ल प्रियांका चोप्रा देखील या सोहळ्यात सहभागी होणार आहे. कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा न्यू-यॉर्क सिटीत पोहोचले आहे. आज ५ मे पासून या रंगतदार सोहळ्याला सुरुवात होत आहे.
शाहरुखच्या मॅनेजर पूजाने एक सोशल मीडिया पोस्टमध्ये कन्फर्म केलं आहे की, शाहरुख खान या बिगेस्ट फॅशन इव्हेंटमध्ये फॅशन डिझायनर सब्यासाचीचे कपडे परिधान करेल. शाहरुख 'बंगाल टायगर' बनून रेड कार्पेटवर उतरेल. शाहरुख पहिल्यांदाच मेट गालाच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवायला तयार आहे.
मेट गाला २०२५ मध्ये दिलजीत दोसांझ, प्रियांका चोप्रा, नाताशा पूनावाला, कियारा आडवाणी, ईशा अंबानी, मोना पटेल हे दिसणार आहेत.
मेट गाला 2025 मध्ये पहिल्यांदाच शाहरुख खान फॅशन डिझायनर सब्यासाचीचे डिझाईन केलेले कपडे परिधान करेल.
'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा पाचव्यांदा रेड कार्पेटवर उतरेल. ती पहिल्यांदा २०१७ मध्ये या सोहळ्यात दिसली होती. रिपोर्टनुसार, ती फ्रेंच लक्झरी फॅशन ब्रँड बालमॅनच्या कॉस्ट्यूममध्ये दिसेल. तर बुल्गारीची ज्वेलरीने लूक पूर्ण करेल.
इंडियन-अमेरिकन एंटरप्रेन्योर मोना पटेलने मागील वर्षी मेट गाला २०२४ मध्ये डेब्यू केला होता.
फ्यूचरिस्टिक लाईन्स आणि ड्रीमलाईक कॉस्ट्यूमसाठी ओळखले जाणारे गौरव गुप्ता यांचे डिझाईन केलेले बेसपोक काऊचर पीस (Bespoke Couture Piece) कियारा परिधान करणार आहे. कियाराने तिच्या ड्रेसचा एक फोटोदेखीस शेअर केला आहे.
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ देखील मेट गालाच्या रेड कार्पेटवर डेब्यू करेल. दिलजीतने सोशल मीडिया अकाऊंटवर मेट गाला २०२५ चे इन्विटेशन कार्ड देखील शेअर केले आहे. दिलजीत रेड कार्पेटवर अमेरिकन रॅपर, सिंगर गुन्ना (Gunna) सोबत दिसणार आहे.