

नवी दिल्लीः सध्याचा लोकप्रिय रॉकस्टार गायक दिलजीत दोसांद त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवर वेगवेळे व्हिडीओ शेअर करत असतो. आता त्यांने लंडमधील एका रेस्टॉरंटमध्ये महागडी कॉफी पिण्यासाठी जातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो तब्बल २६५ पौंड किंमतीची कॉफी ऑर्डर करतो. या एक कप कॉफीची भारतीय रुपयांमध्ये किंमत होते ३०,००० रुपये.
पंजाबी भाषेतील दलजितने व्हाईस ओव्हर दिलेल्या या व्हिडीओमध्ये दिलजीतने गंमतीशीर कंमेट केल्याचे दिसून येते. तो मित्रांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये एन्ट्री करतो. त्यानंतर मेन्यू कार्ड मागवतो. त्यामध्ये असलेली जापनीज टायपिका नॅचरल (Japan Typica coffee) या कॉफीची ऑर्डर देतो याची किंमत २६५ पौंड असल्याचे मेन्यू कार्डमध्ये दिसत आहे.
२६५ पौंडची एक कॉफी ज्याची भारतीय रुपयांमध्ये किंमत ३० हजारांवर होते त्यामध्ये भारतात एखाद्याचे लग्न होऊ शकते असे दिलजीतम्हणताना दिसून येतो. चला एवढे पैसे घेत आहात तर लाडू, जिलेबीपण सोबत देणार आहात का असे मिश्कलपणे दलजित म्हणताना दिसतो.
त्यांनरतर लंडनमधील या रेस्टॉरंटमधील एक महिला वेटर अतिशय युनिक पद्धतीने काचेच्या मग मध्ये त्याच्या समोरच कॉफी तयार करते. त्यांनतर एका गोल्डन कलरच्या एका छोट्या उभट कपातून ती सर्व्ह करते. यावेळी दिलजीत त्याचा एक घोट घेतो व म्हणतो माझ्या चेहर्यावर काही बदल झाला आहे का? हजार - हजार रुपयांचा एक घोट मी घेत आहे. एवढे पैसे घेत आहेत त्यामानाने हे कॉफी मात्र तोलून मापूनच देत आहेत असेही तो मजेशीर अंदाजामध्ये म्हणताना दिसत आहे.
त्यानंतर त्याठिकाणचा बटलर दिलजीतला सांगतो की आमच्या या ठिकाणीच ही जापनिज टायपिका नॅचरल कॉफी ओरिजनल मिळते बाहेर यामध्ये मिलावट केलेली असते. त्यांनंतर दलजित व त्याचे दोन मित्र तिन कपांमध्ये ही कॉफी पितात व ११ - ११ हजार रुपये तिघांचे होतात असे तो म्हणताना दिसतो. एवढी महाग कॉफी पितात त्यावेळी ती कशी लागूदे ती चांगलीच लागली असे म्हणा असे तो मित्रांना म्हणाताना या व्हिडीओमध्ये दिसतो.
हा व्हिडीओ आतापर्यंत ७ लाखांवर लोकांनी पाहिला असून यावर ६००० च्या वर लोकांनी कंमेटचा पाऊस पाडल आहे. तर हा व्हिडीओ १ लाखांवर लोकांनी शेअर केला आहे.