पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता, गायक दिलजीत दोसांझने लुमिनाटी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदींची भेट घेतली. नुकत्याच झालेल्या या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या भेटीत दिलजीत खूपच खूश दिसत आहे. एका फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिलजीत दोसांझची पाठ थोपटताना दिसत आहेत.
गायक, अभिनेता दिलजीत दोसांझने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तो नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक पष्पगुच्छ घेऊन पोहोचला आणि पंतप्रधानत्री मोदी यांनीदेखील दिलजीतशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गायक, अभिनेता दिलजीत दोसांझची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायक दिलजीतचे पंतप्रधानांनी कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी गायकासोबतचे संभाषण अतिशय संस्मरणीय असल्याचे सांगितले. या संवादाची छोटीशी क्लिप त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ते गायक दिलजीत दोसांझची कौतुकाने पाठ थोपटताना दिसले.
पंतप्रधान मोदी यांनी एक्स अकाऊंटवर ट्विट करत म्हटले - 'दिलजीत दोसांझसोबत छान संभाषण. त्याच्याकडे खरोखर अष्टपैलू प्रतिभा आहे. आम्ही संगीत, संस्कृती आणि इतर अनेक माध्यमांनी जोडलेलो आहोत.'
पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर गायक दिलजीत दोसांझने एका पोस्टमध्ये लिहिले - '२०२५ ची ही चांगली सुरुवात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची भेट अतिशय संस्मरणीय झाली. आम्ही संगीताव्यतिरिक्त अनेक गोष्टींबद्दल बोललो.
गायक दिलजीत दोसांझ गेल्या काही महिन्यांपासून देशभरात त्याच्या संगीत मैफिली करत होता. त्याने देशातील विविध राज्यांमध्ये त्यांचे संगीत दौरे केले. या संगीत टूरचे नाव होते दिल लुमिनाटी.