

दिलजीत दोसांझचा ‘बॉर्डर २’ मधील पहिला लूक समोर आला असून तो एअरफोर्स ऑफिसरच्या दमदार भूमिकेत दिसत आहे. त्याचा रौद्र आणि देशभक्तीने भरलेला लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Diljit Dosanjh 's first look in Border2
मुंबई - बॉलीवूडचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी ‘बॉर्डर २’ या बहुचर्चित चित्रपटातील पहिला लूक समोर आला असून, फॅन्सनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीय.
या चित्रपटात दिलजीत एअरफोर्स ऑफिसरच्या दमदार भूमिकेत दिसणार असून, शत्रूचा खात्मा करण्यासाठी सज्ज असलेला त्याचा रौद्र अवतार सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिग्दर्शक अनुराग सिंह आणि निर्माता भूषण कुमार असून ‘बॉर्डर २’ चा हा पहिला लूक जाहीर होताच सोशल मीडियावर चर्चा रंगली. पोस्टरमध्ये दिलजीत एअरफोर्सच्या गणवेशात भेदक नजरेत दिसत आहे.
‘बॉर्डर’सारख्या आयकॉनिक चित्रपटानंतर ‘बॉर्डर २’बद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती. त्यात दिलजीतसारखा अभिनेता देशभक्तीपर चित्रपटात दिसणार असल्याने या उत्सुकतेत आणखी वाढ झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटात भारतीय वायुसेनेच्या महत्त्वाच्या मोहिमांपैकी काही वास्तविक घटनांवर आधारित प्रसंग दाखवले जाणार आहेत. दिलजीतने या भूमिकेसाठी विशेष ट्रेनिंग घेतले असल्याचे समजते.