Samantha married Raj Nidimoru | अखेर सामंथा राज निदिमोरुसोबत विवाहबद्ध, सोशल मीडियावरील फोटोंनी केले कन्फर्म!

Samantha married Raj Nidimoru | अखेर सामंथा राज निदिमोरुसोबत विवाहबद्ध, सोशल मीडियावरील फोटोंनी कन्फर्म!
image of Samantha- Raj Nidimoru
Samantha ruth prabhu married Raj Nidimoruinstagram
Published on
Updated on
Summary

सामंथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरु यांच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर चर्चा होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघेही पारंपरिक पोशाखात दिसत आहेत. फॅन्सनी दोघांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

Samantha ruth prabhu married director Raj Nidimoru

मुंबई - दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा विवाहबद्ध झाल्याची बातमी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने दिग्दर्शक राज राज निदिमोरुसोबत लग्न केले आहे. कोईमत्तूर येथील इशा फौंडेशन याठिकणी त्यांचा विवाह हिंदू पद्धतीने झाल्याचे म्हटले जात आहे.

image of Samantha- Raj Nidimoru
Bigg Boss Marathi 6 | सलमान खानने केली घोषणा, बिग बॉस मराठी कोण होस्ट करणार? 'या' अभिनेत्याचे नाव समोर

निर्माते व दिग्दर्शक राज निदिमोरु हे लेखक देखील आहेत. गेल्या महिन्यांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. मात्र, नुकतेच समोर आलेल्या काही खासगी फोटोंनी या चर्चांवर शिक्कामोर्तब केल्याची भावना फॅन्समध्ये दिसून येते.

सोहळा अतिशय साधा आणि मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडल्याचे दिसते. दोघांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद स्पष्ट दिसतो. लग्नाचा हा सोहळा खासगी पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र यांनाच निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सामंथा पारंपरिक लाल सिल्क साडीत दिसत असून, तिच्या जवळ राज निदिमोरु पारंपरिक वेषात हसत उभे असल्याचे दिसते. या फोटोंमध्ये मंदिरे, पूजा विधी आणि काही जवळच्या लोकांची उपस्थिती दिसत आहे. त्यामुळे हे फोटो विवाहसोहळ्यातील असल्याचे दिसते.

सामंथा आणि राज यांच्यातील जवळीक ‘द फॅमिली मॅन’ या सिरीजपासून दिसू लागली होती, अशी चर्चे होती. दोघेही अनेकदा एकत्र दिसत असल्यानं त्यांच्या नात्याबद्दल तर्क-वितर्क सुरू झाले होते. मात्र दोघांनीही कधीही हे नाते उघडपणे मान्य केले नव्हते. त्यामुळे हे फोटो समोर येताच सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

image of Samantha- Raj Nidimoru
Suraj Chavan wedding | सुरजच्या हळदीत जान्हवी किल्लेकरची धमाल! अक्षदाही सज्ज; व्हिडिओ व्हायरल

सामंथाने यापूर्वी अभिनेता नागा चैतन्य याच्याशी लग्न केले होते. मात्र काही वर्षांपूर्वी दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर सामंथा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत होती. परंतु ‘दि फॅमिली मॅन’ चे दिग्दर्शक असलेल्या राज राज निदिमोरु यांच्या जवळीकतेमुळे दोघांचे नाते अधिक दृढ झाले असल्याचे बोलले जात होते. शेवटी, त्यांनी आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news