Dia Mirza Experience: ‘100 पुरुषांसमोर कपडे उतरवावे लागले...’; दिया मिर्झाने सांगितला 22 वर्षांपूर्वीचा धक्कादायक अनुभव

Dia Mirza Tumsa Nahin Dekha Shooting Experience: दिया मिर्झाने ‘तुमसा नहीं देखा’मधील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा अत्यंत आव्हानात्मक अनुभव सांगितला आहे.
Dia Mirza Experience
Dia Mirza ExperiencePudhari
Published on
Updated on

Dia Mirza Tumsa Nahin Dekha Shooting Experience: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दिया मिर्झा आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बेधडक मतांसाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक अनुभव सांगितला आहे. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटातील ‘मुझे तुमसे मोहब्बत है’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा हा प्रसंग आहे.

‘शेकडो पुरुषांसमोर अत्यंत कमी कपड्यांत शूटिंग करावे लागले’

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत दिया मिर्झाने सांगितले की, या गाण्याचे शूटिंग तिच्यासाठी सुरुवातीला अजिबात सोपे नव्हते. सेटवर शेकडो पुरुष उपस्थित असताना तिला अत्यंत कमी कपड्यांमध्ये परफॉर्म करावा लागला होता.

या अनुभवाबद्दल बोलताना दिया म्हणाली की, “या अनुभवाने मला अशा प्रकारे मुक्त केले, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. हे गाणे ज्या आत्मविश्वासाने मी करू शकले, त्यामागे कोरिओग्राफर वैभवी मर्चंट आणि संपूर्ण टीमचा मोठा वाटा होता. त्यांनी मला सेटवर अतिशय सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार केले.”

तिने पुढे सांगितले की, एक तरुणी म्हणून हा तिच्या आयुष्यातील सर्वांत कठीण अनुभवांपैकी एक होता. “मला सेटवर शेकडो पुरुषांसमोर जवळपास केवळ इनरवेअर आणि ब्रामध्ये शूटिंग करावे लागले,” असे तिने सांगितले.

‘सेटवर 500 लोक आहेत की 1,000, याचा विचार केला नाही’

दियाने सांगितले की, तोपर्यंत तिला अभिनयातील एक महत्त्वाची गोष्ट समजली होती. कलाकारासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो साकारत असलेल्या व्यक्तिरेखेची सत्यता आणि पडद्यावर काय दाखवायचे आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

ती म्हणाली, “त्यामुळे त्या खोलीत 500 लोक आहेत की 1,000 लोक, याने मला फारसा फरक पडत नव्हता.” करिअरच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या अनेक आव्हानांनीच अभिनेत्री म्हणून आपली जडणघडण झाली असल्याचेही दियाने नमूद केले. गेल्या अनेक वर्षांत आलेल्या अनुभवांमधूनच अभिनयात अधिक बारकावे, खोली आणि वास्तव आणता आले, असे ती म्हणाली.

Dia Mirza Experience
Shweta Tiwari: आधी मनसेवर आरोप, आता राज ठाकरेंचे मानले आभार; श्वेता तिवारीच्या पोस्टने पुन्हा खळबळ, नेमकं काय घडलं?

‘त्या चित्रपटाने मला माझ्या शरीराविषयी आत्मविश्वास दिला’

दिया मिर्झा ही हैदराबादमधील एका पारंपरिक आणि तुलनेने कंझर्व्हेटिव्ह वातावरणात वाढली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तिला आपल्या शरीराविषयी आत्मविश्वास वाटत नव्हता. मात्र, ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटात काम केल्यानंतर तिच्या विचारांमध्ये आणि आत्मविश्वासात मोठा बदल झाला.

दिया म्हणाली, “मी हैदराबादमधील एका कंझर्व्हेटिव्ह पार्श्वभूमीतून आले आहे. सुरुवातीला मी माझ्या शरीराविषयी फारशी कॉन्फिडंट नव्हते. पण त्या चित्रपटाने मला माझ्या शरीराविषयी खूप आत्मविश्वास दिला. विशेषतः ‘मुझे तुमसे मोहब्बत है’ या गाण्याने मला खूप मुक्त वाटले.” तिने असेही सांगितले की, शिकण्याची आणि स्वतःला अधिक चांगले घडवण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

Dia Mirza Experience
Sonia Gandhi Book: सोनिया गांधींच्या पुस्तकात नेमकं काय आहे? पेंग्विनने छापण्यास दिला नकार; कोणता मजकूर हटवण्याची केली मागणी?

‘तुमसा नहीं देखा’ चित्रपटाबद्दल...

2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटात दिया मिर्झाने एका डान्सरची भूमिका साकारली होती, तर इमरान हाश्मीने श्रीमंत तरुणाची भूमिका केली होती. प्रेम, नातेसंबंध आणि कौटुंबिक दबाव याभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसू यांनी केले होते. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासह इतर कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

दिया मिर्झाच्या वर्क फ्रंटबद्दल...

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, दिया मिर्झा अलीकडेच ‘ऑपरेशन सफेद सागर’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. 1999 च्या कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाच्या मोहिमेशी संबंधित कथानकावर ही सीरिज आधारित असल्याचे सांगितले जाते. या प्रोजेक्टमधील तिच्या अभिनयाचीही प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी प्रशंसा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news