Dhurandhar 2 trailer release: प्रतीक्षा संपली! तारीख लक्षात ठेवा, 'धुरंधर २' चा ट्रेलर 'या' दिवशी येणार
Dhurandhar 2 trailer release
मुंबई: 'धुरंधर' या चित्रपटाच्या तुफान यशानंतर प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'धुरंधर: द रिव्हेंज'चे पहिले पोस्टर समोर आल्यापासूनच चाहत्यांमध्ये ट्रेलरबाबतची उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपली असून, रणवीर सिंगच्या या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर झाली आहे.
उद्या सकाळी ११:०१ वाजता होणार ट्रेलर लाँच
आदित्य धर दिग्दर्शीत या चित्रपटाबाबत 'जिओ स्टुडिओ' आणि 'B62 स्टुडिओ'ने महत्त्वाची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक नवीन पोस्टर शेअर करत माहिती दिली की, 'धुरंधर २'चा ट्रेलर उद्या, शनिवार ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजून १ मिनिटाने प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरसोबत "हौसला, ईंधन, बदला" असे कॅप्शन देण्यात आले आहे. रणवीर सिंगनेही स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ट्रेलरची माहिती दिली आहे, यामुळे प्रेक्षकांमधील उत्कंठा प्रचंड वाढली आहे.
५ भाषांमध्ये चित्रपट होणार प्रदर्शित
पहिल्या भागाच्या अफाट लोकप्रियतेमुळे निर्मात्यांनी 'धुरंधर २' मोठ्या स्तरावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट केवळ हिंदीतच नाही, तर तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा एकूण पाच भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
काय असेल 'धुरंधर २'ची कथा?
पहिल्या भागामध्ये गँगस्टर रहमान डकैत आणि पाकिस्तानी दहशतवादी नेटवर्कवर प्रकाश टाकण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या भागात रणवीर सिंगने साकारलेली 'हमजा अली मजारी' ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी असेल. जसकीरत सिंह रंगी याची 'हमजा' बनून पाकिस्तानात झालेली एन्ट्री आणि त्याचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. मुळात 'धुरंधर' मिशन नेमके काय होते, यावर या भागात अधिक भाष्य केले जाईल. हा चित्रपट १९ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, परदेशात या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

