

मुंबई - धूम ४ च्या चर्चेत आणखी एक अपडेट आलीय. अयान मुखर्जी ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते, तो चित्रपट त्यांनी अचानक सोडला आहे. पण, अखेरीस, संपूर्ण प्रकरण अचानक पालटलं. अयान मुखर्जी रणबीर कपूरचा खास दोस्त आहे. पण, अयानने धूम ४ सोडण्यामागे नेमकं कारण काय आहे, याची चर्चा सुरु आहे.
रणबीरचा जिवलग मित्र आणि ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीने अचानक ‘धूम ४’ मधून माघार घेतली आहे. अयान मुखर्जी कडे ‘बह्मास्त्र २’ देखील आहे. आलिया भट्ट - रणबीर कपूर च्या या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, YRF वाल्यांनी प्लॅनिंग केली होती की, अयान सोबत रणबीर मिळून धूम ४ मध्ये देखील काम करतील. आता ‘वॉर २’ नंतर अयानसाठी आणखी एक मोठी संधी होती. आता धूम ४ पासून मागे हटण्याचे कारण ‘बह्मास्त्र २’ आहे की आणखी काही?
रिपोर्टनुसार, अयान मुखर्जी Dhoom च्या चौथ्या फ्रेंचायझीमध्ये दिसणार नाहीत. ते चित्रपट दिग्दर्शित करणार नाहीत. त्यामुळे आदित्य चोप्रा आणि YRF ला नवा दिग्दर्शक शोधावा लागणार आहे. वॉर २ फ्लॉप झाल्यानंतर अयानने धूम ४ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. नव्या रिपोर्टनुसार, अयानने आदित्य चोप्रा सोबत बातचीत करून चित्रपट दिग्दर्शित करण्याबाबत आक्षेप नोंदवला. अयान मुखर्जी यांचे मानणे आहे की, ‘वॉर २’ आणि ‘धूम ४’ सारखे चित्रपट त्यांच्यासाठी बनलेले नाहीत. हे चित्रपट त्यांच्यासाठी कधीही बनले नव्हते. रोमान्स, ड्रामा आणि कहाणी सोबत आणखी दुसरे काहीतरी करु इच्छितात. दुसरीकडे, अयानचा वॉर २ फ्लॉप ठरला आहे, जो ४०० कोटींच्या बजेटमध्ये बनला होता.
रिपोर्टनुसार, अयान आता ‘ब्रह्मास्त्र २’ वर काम करत आहे, जो २०२६ च्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल. सध्या स्क्रिप्टिंगवर काम सुरु आहे.