

धर्मेंद्र यांच्या जन्मदिनी हेमा मालिनी, सनी देओल आणि ईशा देओल यांनी त्यांच्या जुने फोटो आणि भावूक संदेश शेअर करत सोशल मीडियावर आठवणींचा वर्षाव केला.
Hema Malini Post On Dharmendra Birth Anniversary
दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांच्या वाढदिनी त्यांच्या पत्नी, अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. सोबतच त्यांची मुले ईशा देओल आणि सनी देओल यांनीही एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे.
पोस्टमध्ये हेमा मालिनी यांनी काय लिहिलंय?
हेमा मालिनी यांनी एक्स अकाऊंटवर धर्मेंद्र यांच्यासोबत आपले दोन फोटो शेअर केले हेत. हेमा यांनी लिहिलंय, 'धरम जी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दोन आठवडे झाले तुम्ही मला अचानक सोडून गेलात. माझं मन तुटलं होतं. पण आता हळू-हळू तुकड्यांना जोडत आहे. आपलं आयुष्य पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
''परमेश्वराचे आभार''
हेमा यांनी पुढे म्हटलंय- ''तुम्ही शरीराने दूर गेला तरी माझी आत्मा नेहमी तुमच्यासोबत राहिल. आमच्या सोबत घालवलेले ते क्षण, आमचे आनंदाचे क्षण-आठवणीकधीही मिटू शकत नाहीत. त्या आठवणींमध्ये पुन्हा पुन्हा जगणे खूप आनंद आणि समाधान देणारे आहे. मी परमेश्वराचे लाख-लाख आभार मानते की त्यांनी आम्हाला इतकी सुंदर वर्षे जगण्याची संधी दिली. आमच्या दोन गोड मुली आणि खूप साऱ्या आठवणी, माझ्या मनात नेहमीच जीवंत राहतील.''
ईशाने पोस्ट केले फोटो
धर्मेंद्र-हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल यांनी आपल्या वडिलांसोबतचे काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिने म्हटलंय -
तिने आपल्या पिताश्रींच्या शिकवणीचा वारसा पुढे नेण्याचेही वचन दिले आहे. धर्मेंद्र यांची शिकवण—“नेहमी विनम्र रहा, आनंदी रहा, निरोगी रहा आणि मजबूत रहा”—ती आपल्या आयुष्यात अभिमानाने पाळेल, असे तिने सांगितले. तसेच पप्पांचे प्रेम लाखो चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचाही ती निर्धार करते. शेवटी, अतिशय भावूक होत ती म्हणते,“पापा, मी तुम्हाला खूप प्रेम करते आणि खूप आठवण येते. तुमची मुलगी, तुमची ईशा, तुमची बिट्टू.
अभय देओलने धर्मेंद्र यांच्या सोबतचा एक फोटो शेअर केला आणि म्हटले की, “हा फोटो १९८-८६ चा असेल. ... त्यांनी मला जवळ बोलावले..बसवले आणि म्हणाले... उजेडाकडे पाहा आणि फोटोग्राफरला हा फोटो क्लिक करायला सांगितला. मी त्या क्षणाची वाट पाहत आहे, जेव्हा मी त्यांना पुन्हा हे शब्द म्हणताना पाहिन...जेव्हा माझी वेळ येईल, आज त्यांचा वाढदिवस होता.”