Devara Song : जान्हवी कपूरच्या मादक अदा, ज्यु. एनटीआरसोबत रोमान्स

जान्हवीचा ज्यु. एनटीआरसोबत रोमान्स पाहून शिखर पहाडियाची अशी आली रिॲक्शन
Devara Song dheere dheere
देवरा चित्रपटातील धीरे धीरे गाणे रिलीज झाले आहे x account
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - जान्हवी कपूर आणि Jr NTR च्या 'देवरा' चित्रपटातील गाणे 'धीरे-धीरे' रिलीज झाले आहे. रोमँटिक अंदाजात जान्हवी खूप मादक दिसत आहे. जान्हवी कपूर-ज्युनियर एनटीआर चित्रपट 'देवरा'चे सेकंद सिंगल 'धीरे-धीरे' रिलीज केलं आहे. दोघेजणही रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपला चित्रपट 'उलझ'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नाही. तिचा आगामी चित्रपट 'देवरा'मुळे चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाचे गाणे 'धीरे-धीरे' रिलीज करण्यात आले आहे.

'धीरे-धीरे' देवरा या चित्रपटाचे दुसरे गाणे आहे. याआधी ज्युनियर एनटीआर - जान्हवीचा चित्रपट 'देवरा'चे पहिले गाणे 'फियर' रिलीज झाले होते. हे गाणे पसंतीस उतरले होते. आता 'धीरे-धीरे' गाणे देखील फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि जान्हवीचे गजब रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे. हे गाणे हिंदी शिवाय तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज करण्यात आले आहे.

जान्हवी कपूर - ज्युनियर एनटीआरचा चित्रपट 'देवरा'तील धीरे-धीरे गाण्याला शिल्पा रावने आवाज दिला आहे. तर अनिरुद्धने एनटीआरसाठी आवाज दिला आहे. यामध्ये जान्हवी-ज्युनियर एनटीआरच्या गजब केमिस्ट्रीने फॅन्सची मने जिंकली आहेत. दोघेही रोमँटिक अंदाजावर फॅन्स फिदा झाले आहेत. हे गाणे ऐकल्यानंतर एका युजरने ज्युनियर एनटीआरला खरा ग्लोबल स्टार म्हटलं आहे. तर एका युजरने लिहिलं की, 'खूप चांगलं गाणं आहे, जय एनटीआर'. दुसऱ्या एका युजरने जान्हवी - जूनियर एनटीआर शिवाय गायिका शिल्पाचे कौतुक करत लिहिले की, 'एनटीआरची उपस्थिती +जान्हवीचे एक्सप्रेशन्स+शिल्पाचा आवाज'. आणखी एकाने फायर इमोजी शेअर केली आहे.

यादिवशी रिलीज होणार 'देवरा'

जान्हवी कपूरसाठी हा चित्रपट खूप खास ठरणार आहे. कारण, ते 'देवरा'च्या माध्यमातून साऊथ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये आपले डेब्यू करायला जात आहे. श्रुती मराठे, प्रकाश राज, श्रीकांत, सैफ अली खान, शाईन टॉम चाको देखील चित्रपटात दिसतील. 'देवरा' मोठ्या पडद्यावर २७ सप्टेंबर २०२४ रोजी रिलीज होईल.

जान्हवीचा मित्र शिखर पहाडियाने जान्हवीची इन्स्टा स्टोरी शेअर करत लिहिले-वॉव. मास..सोबत हार्ट इमोजीही शेअर केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news