Devara Part 1 | रिलीजच्या ५ दिवस आधी 'देवरा पार्ट-१' चा दमदार ट्रेलर रिलीज

Devara Part 1 Release Trailer | समुद्रात मृतदेहांनी भरलेल्या नावेची झलक, देवराचा ट्रेलर पाहाच
Devara Part 1 trailer
देवरा चित्रपटाचा नवा दमदार ट्रेलर रिलीज झाला Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूरचा देवरा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. त्याआधी देवरा हिंदी पार्ट १ चा नवा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये रक्ताने भरलेल्या समुद्रात आणि त्यात वाहते मृतदेह पाहून अंगावर काटा येईल. ट्रेलर पाहिल्यानंतर फॅन्स म्हणत आहेत की, हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल.

ट्रेलरची सुरूवात समुद्रात वाहत्या रक्ताने होते. आजूबाजूला पाण्यात मृतदेह वाहताना दिसताहेत. त्यानंतर ज्युनियर एनटीआर मृतदेहांजवळ बसलेला दिसतो. ट्रेलरमध्ये पुढे सैफ अली खान देखील दिसतो. एका सीनमध्ये रक्ताने भरलेली नाव दिसते. यापुढे जान्हवी कपूरदेखील दिसते. एका सीनमध्ये शार्क आणि समुद्राच्या आत हाडाचा सापळादेखील पाहायला मिळतात.

चित्रपटात टीआर, जान्हवी कपूर, सैफ अली खान, प्रकाश राज, श्रुती मराठे, शाईन टॉम चाको, कलाईआरसन आणि नरैन मुख्य भूमिकेत आहेत. देवरा ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनली आहे. सूत्रांनुसार, रिलीजच्या आधी चित्रपटाचे प्री-सेल्स आणि ॲडव्हान्स तिकिट बुकिंगने जगभरात देवराने १८० कोटींची कमाई केली आहे.

Devara Part 1 trailer
गुजरातची रिया सिंघा बनली मिस युनिव्हर्स इंडिया, उर्वशी रौतेलाने घातला मुकूट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news