पुढारी ऑनलाईन डेस्क - साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा देवरा पार्ट-१ चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर तो आता ओटीटीवर पाहता येणार आहे. हा चित्रपट सिनेमागृहात एक महिना पूर्ण करणार असून आता देवराच्या ओटीटी रिलीजची चर्चा सुरु झाली होती. (Devara On Netflix) या चित्रपटाचे हक्क नेटफ्लिक्स इंडियाकडे आहेत आणि त्यांनी ओटीटी रिलीजची घोषणा केली. (Devara On Netflix)
ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर स्टारर चित्रपट देवरा : भाग १ हा २७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये रिलीज झाला आहे. दिग्दर्शक कोरटाला सिवा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ॲक्शन-थ्रिलरने भरपूर हा चित्रपट आता ओटीटीवर पाहता येईल. कमाईच्या बाबातीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही.
या चित्रपटातून जान्हवी कपूरने तेलुगुमध्ये पदार्पण केले आहे. तिची ज्यु. एनटीआरसोबतची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना आवडलीय. मंगळवारी ५ नोव्हेंबरला, नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, हा चित्रपट तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज आहे.
एका नेटकऱ्याने लिहिले, "वाह, वाट पाहत आहे." दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, "देवरा नावाचे वादळ येत आहे." अनेकांनी रेड हार्ट आणि फायर इमोजी बनवून आपली उत्सुकता दाखवली. सैफ अली खानने 'देवरा'मध्ये 'खलनायक भैरा'ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात शाइन टॉम चाको, प्रकाश राज, श्रीकांत आणि अजय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.