Deool Band 2 Box Office: 10 कोटीच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 'देऊळ बंद 2' ची विक्रमी कमाई, कमावला 466 टक्के नफा

Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद 2' या मराठी चित्रपटाने अवघ्या 10 कोटी रुपयांच्या बजेटवर तब्बल 56.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने 466 टक्के नफा कमावत सुपरहिटचा दर्जा मिळवला आहे.
Deool Band 2 Box Office Collection
Deool Band 2 Box Office CollectionPudhari
Published on
Updated on

Deool Band 2 Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो चित्रपट म्हणजे 'देऊळ बंद 2'. अवघ्या 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवत या चित्रपटाने केवळ आपला खर्च वसूल केला नाही, तर तब्बल 466 टक्के नफा कमावून निर्मात्यांनाही सुखद धक्का दिला आहे.

सध्या मोठ्या बजेटचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत असताना 'देऊळ बंद 2' मात्र बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 17 दिवस उलटले असले तरी त्याची कमाई थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट प्रत्येक आठवड्याला चित्रपटाला अधिक चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

अहवालानुसार, चित्रपटाने 17 व्या दिवशी तब्बल 2.6 कोटी रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे 16 व्या दिवशी चित्रपटाने 1.4 कोटींची कमाई केली होती. म्हणजे एका दिवसात कमाईत तब्बल 85 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. हा आकडा चित्रपटाच्या लोकप्रियतेची साक्ष देणारा आहे.

'देऊळ बंद 2' ने पहिल्या आठवड्यात 30.2 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची घोडदौड कायम राहिली आणि आणखी 22.4 कोटी रुपये कमावले. 17 दिवसांच्या अखेरीस चित्रपटाची एकूण नेट कमाई 56.6 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर ग्रॉस कलेक्शनचा आकडा 66.78 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.

चित्रपटाचे बजेट केवळ 10 कोटी रुपये असल्याने निर्मात्यांना तब्बल 46.6 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाचा 'रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट' म्हणजेच ROI 466 टक्क्यांवर पोहोचला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ही कामगिरी अत्यंत उल्लेखनीय मानली जात आहे.

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथानक, अभिनय आणि भावनिक मांडणी यामुळे चित्रपटाला सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे 'देऊळ बंद 2' आता मराठी चित्रपटांच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत टॉप-5 मध्ये पोहोचला आहे. आता त्याचे लक्ष्य आहे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या सुपरहिट 'वेड' चित्रपटाचा विक्रम मोडण्याचे.

'वेड' या चित्रपटाने 61.2 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. सध्या 'देऊळ बंद 2' च्या खात्यात 56.6 कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे 'वेड'ला मागे टाकण्यासाठी चित्रपटाला आणखी केवळ 4.61 कोटी रुपयांची गरज आहे. चित्रपटाची सध्याची कमाई पाहता हा टप्पा गाठणे फार अवघड वाटत नाही.

Deool Band 2 Box Office Collection
Nitya Menon on Peddi Janhvi Kapoor | 'तिला ठामपणे नकार देता आला असता'; साऊथ स्टार नित्या मेननने 'पेड्डी'तील सीन्सवर घेतला आक्षेप

मराठी चित्रपटांच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सध्या 'राजा शिवाजी' 105.26 कोटी रुपयांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर 'सैराट' 90 कोटी, 'बाईपण भारी देवा' 76.28 कोटी आणि 'वेड' 61.2 कोटी रुपयांसह हे चित्रपट आहेत. आता 'देऊळ बंद 2' या यादीत चौथ्या स्थानावर झेपावण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

Deool Band 2 Box Office Collection
Dharna Durga | कुशा कपिला, प्राजक्ता कोळीनंतर आता धर्ना दुर्गा! कोण आहे मां-बहेन फेम 'ही' अभिनेत्री?

एकंदरीत, कमी बजेट, दमदार कथा आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे 'देऊळ बंद 2' हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात मोठ्या मराठी बॉक्स ऑफिसपैकी एक आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी कोणते विक्रम मोडतो, याकडे आता संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news