

Deepika Removed Spirit joins Allu Arjun big budget film
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या वाढत्या डिमांडला कंटाळून दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने मोठा निर्णय घेतला आहे. तिला स्पिरीट या चित्रपटातून हटवल्याची माहिती मिळत असून यामध्ये साऊथ स्टार प्रभासची मुख्य भूमिका आहे. दुसरीकडे दीपिकाच्या झोळीत दुसरा चित्रपट पडला आहे. तबबल ७०० कोटींचा हाय बजेट असणारा चित्रपट तिला मिळाल्याची माहिती समोर येतेय.
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे कबीर सिंग आणि अॅनिमल या चित्रपटांसाठी ओळखले जातात. आता संदीप स्पिरीट नावाचा चित्रपट आणत आहेत. हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे आणि यापूर्वी दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होती. पण 'अनप्रोफेशन डिमांड' म्हणत दिग्दर्शकाने तिला या भूमिकेतून काढल्याचे म्हटले जात आहे.
अॅटलीच्या आगामी अॅक्शन चित्रपट 'AA22×A6' मध्ये दीपिका पदुकोण दिसणार असल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदाच अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. हा बिग बजेटचा चित्रपट दिग्दर्शक अॅटलीसोबत तिचा दुसरा चित्रपट असेल आणि दक्षिण सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत तिचा पहिला चित्रपट असेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पादुकोणच्या मागण्या अनप्रोफेशनल असल्याचं सांगितलं जातय. दीपिकाने चित्रपटाच्या नफ्यातील १ टक्के रकमेसह मोठी फी मागितली. शिवाय, दीपिकानं तेलुगूमध्ये डायलॉग बोलण्यास नकार दिला. 'स्पिरिट'साठी तिला सर्वात मोठी फी म्हणून तब्बल २० कोटी मिळणार होते. पण तिन सर्वच्या सर्व मागण्या अनप्रोफेशनल केल्याने दिग्दर्शक नाराज झाले, अशी माहिती समोर आलीय.
आता संदीप वांगा दीपिका ऐवजी कोणत्या अभिनेत्रीला घेणार? याकडे सिनेरसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.