Deepika-Ranveer | सिद्धिविनायकाच्या चरणी रणवीर-दीपिका; दुसऱ्या बाळाच्या आगमनापूर्वी घेतले बाप्पाचे दर्शन!

लवकरच होणार आहे रणवीर दीपीकाच्या घरी दुसऱ्या बाळाचे आगमन!
Deepika-Ranveer | सिद्धिविनायकाच्या चरणी रणवीर-दीपिका;
Deepika-Ranveer | सिद्धिविनायकाच्या चरणी रणवीर-दीपिका;
Published on
Updated on

Deepika-Ranveer in Siddhivinayak temple बॉलिवूडची लोकप्रिय जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या घरी लवकरच पुन्हा एकदा चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दुसऱ्यांदा आई-बाबा होणाऱ्या या दांपत्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी रणवीर प्रेग्नेटं असल्याने दिपीकाची काळजी घेताना दिसला.

पारंपरिक वेशभूषेत दोघेही पोहचले मंदिरात

सिद्धिविनायक मंदिरात उपस्थित असताना दोघेही पारंपरिक वेशभूषेत लक्ष वेधून घेत होते. दीपिकाने मॅटर्निटी एथनिक पोशाख परिधान केला होता, तर रणवीरही सणाच्या पारंपरिक लुकमध्ये दिसला. मंदिर परिसरात गर्दी असल्याने रणवीरने दीपिकाचा हात धरला होता. गर्दीतून वाट काढत तो दीपिकाला सुरक्षितपणे पुढे घेऊन जात होता.

Deepika-Ranveer | सिद्धिविनायकाच्या चरणी रणवीर-दीपिका;
Deepika Padukone baby bump : दीपिकाने फ्लॉन्ट केला बेबी बंप! ‘दुआ’च्या क्युट स्माईलने जिंकली मने

दुवाच्या जन्मावेळीही पोहचले होते सिद्धीविनायकाच्या चरणी

याआधी सप्टेंबर २०२४ मध्ये मुलगी ‘दुआ’ हिच्या जन्मापूर्वीही या दोघांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्या बाळाच्या जन्मापूर्वी त्यांनी बाप्पाच्या चरणी लीन होणे पसंत केले आहे.

लालबागच्या राजाच्या चरणीही रणवीरची हजेरी

सिद्धिविनायक दर्शनाच्या एक दिवस आधी, गुरुवारी रात्री रणवीर सिंगने मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागच्या राजा’चेही दर्शन घेतले. करी रोड परिसरातील नवसाच्या गणपतीसमोर नतमस्तक होत त्याने आशीर्वाद घेतले होते. यावेळी चाहत्‍यांमध्ये रणवीरची प्रचंड क्रेझ दिसून आली तो व्हीआयपी रागेंतून जात असताना, अनेक चाहत्‍यांशी हस्तांदोलन करताना दिसत होता. यावेळी त्‍याचा नेहमीचा चार्म दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news