

अभिनेत्री दीपिका कक्कर गेले काही महीने लिव्हर कॅन्सरला तोंड देते आहे. एक रिअलिटी शो दरम्यान दीपिकाची तब्येत बिघडली. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये तिला लिव्हर कॅन्सर असल्याचे समोर आले. यानंतर दीपिकाची सर्जरी झाली. या दरम्यान दीपिका आणि तिचा पती शोएब चाहत्यांना वेळोवेळी प्रकृतीबाबत अपडेट देत असतात. आताही दीपिकाने तिच्या व्लॉगमधून तिची हेल्थ अपडेट शेयर केली आहे. (Latest Entertainment News)
काही दिवसांपूर्वीच दीपिकाने ट्रीटमेंटच्या साइड इफेक्टबाबत शेयर केले होते. तिला या साईड इफेक्टचा त्रास होत असल्याचे सांगितले होते. आता यासोबतच तिच्यासमोर एक नवीन समस्या उभी राहिली आहे. दीपिकाला आता व्हायरल इनफेक्शनचा त्रास होतो आहे. याबाबत बोलताना तिने सांगितले की तिची तब्येत खूपच बिघडली असून अंगात त्राण उरले नाही.
याचे कारण सांगताना दीपिका म्हणते, ‘कॅन्सरमुळे माझी रोगप्रतिकारक शक्ति कमी झाली आहे. त्यामुळे या इन्फेक्शनची तीव्रता माझ्यासाठी जास्त आहे.
जून 2025मध्ये दीपिकाला लिव्हर कॅन्सरसाठी सर्जरी करावी लागली होती. त्यानंतर जुलैपासून तिच्यावरील उपचारांचा पुढील टप्पा सुरू झाला. यामुळे तिच्या रोगप्रतिकारक शक्तिवर खूप परिणाम झाला असून तिला अशक्तपणा आहे. ‘ माझी अवस्था खूपच खराब आहे. मलाही रूहान सारखेच व्हायरल इन्फेक्शन झाले आहे. पण माझी ट्रीटमेंट सुरू असल्याने याचा मला जास्त त्रास होतो आहे. मला डॉक्टररांनी आधीच सांगितले होते की व्हायरलची थोडी लक्षणे दिसली तरी मला संपर्क साधा. मला सध्या औषधांचा खूप हेवी डोस दिला जातो आहे. माझ्यावर त्याचा परिणाम होतो आहे.
दीपिकाने फॅन्सना सांगितले की कॅन्सरविरोधी थेरपीमुळे मला तोंडात अल्सर, हातावर व्रण, नाक, गळा यांच्यावर होणारा परिणाम तसेच केसगळतीही प्रचंड होते आहे. दीपिकाने लवकर बरी व्हावे यासाठी तिचे फॅन्स प्रार्थना करत आहेत.