

आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे मेघा घाडगे. पछाडलेला सिनेमातील भूमिकेतून तिने स्वत:ची खास ओळख केली. पण यापूर्वी मेघा अनेक लावणी कार्यक्रमांमधून दिसली आहे. सुरेखा पुणेकर आणि माया जाधव यांसारख्या कसलेल्या लावणी नृत्यांगनाच्या सोबत मेघा यांनी काम केले आहे.
पछाडलेलानंतर मेघा यांनी कोणत्याही उल्लेखनीय सिनेमात काम केले नाही. आपण सिनेसृष्टीतून लांब का गेलो याबाबत त्यांनी एका मुलाखतीमध्ये शेअर केले आहे. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे.
त्या म्हणतात, कॉलेजपासूनच माझ्या नृत्याच्या करियरची सुरुवात झाली. त्यानंतर मला पछाडलेला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमातील माझ्या कामाचे कौतुकही झाले. त्यानंतर मला सिनेमांच्या ऑफर्स यायच्या. पण त्यासाठी समोरील व्यक्तीची मागणी मला अस्वस्थ करायची. पछाडलेला नंतर मला सिनेमांच्या ऑफर्स आल्या.
पण दोन वेळा काम हवे असेल तर कॉम्प्रमाइज करावे लागेल असे अडून अडून सुचवण्यात आले. मी या प्रकाराने अवघडून गेले. तेव्हा माझ्या लक्षात आले हा माझा प्रांत नाही. तेव्हापासून मी सिनेसृष्टीत दिसले नाही. हे मी ठरवून केले.खरे तर अशी मागणी करणाऱ्या लोकांना खरमरीत उत्तर देण्याची इच्छा होती. पण मी बोलू शकले नाही. कारण मी नवीन होते. मला बदनामीची भीती वाटत होती. त्यातून माझे काही निर्णय चुकले ते चुकलेच.
यानंतर मी स्वत:ला सगळ्यांपासून वेगळे केले. यादरम्यान मैत्रिणी या गोष्टीने मला सगळ्यात जास्त वेगळे व्हायला मदत केली. एका क्षणाला वाटले स्वतला शून्यातून किती वेळा उभे करायचे. माझ्याबाबत वाटेल त्या चर्चा, अफवा याला मी थकले होते. एखाद्या मुलाशी बोलताना दिसले तरी अफेअरच्या अफवा उडायच्या. मी असे सांगेन मैत्री करू नये. यातून मी इतकेच शिकले की कितीही जवळची मैत्रीण असू दे पर्सनल गोष्ट शेयर करू नका. काही शेयर करायचे नाही. काही बोलावेसे वाटले तर एका डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरडा पण शेयर करू नका. विश्वासातली मैत्री ठेवा. सगळच कोणाला सांगत जाऊ नका.