

मुंबई - इंग्लंडमध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती आणि बिझनेसमॅन संजय कपूर यांचे ५३ व्या वर्षी निधन झाले. हार्ट ॲटॅक ने मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. पण नंतर अशी माहिती समोर आली की, त्यांनी एक मधमाशी गिळली होती, ज्यामुळे मधमाशीने घशात चावा घेतला. त्यानंतर श्वास गुदमरून तिथेच ते कोसळले. कुणालाही खरे वाटणार नाही, अशी एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्स करीना कपूर, सैफ अली खान, मलायका अरोरा, अमृता अरोरा करिश्मा कपूरच्या घरी पोहोचले.
संजय कपूर यांच्या निधनाची माहिती सर्वात आधी अभिनेते, लेखक सुहेल सेठने सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी एक्स अकाऊंटवर लिहिलं, 'संजय कपूर यांच्या निधनाने खूप दु:ख झाले. १२ मे च्या सकाळी इंग्लंडमध्ये त्यांचे निधन झाले. हे खूप मोठं नुकसान आहे. त्यांचे कुटुंबीय आणि परिवाराप्रति खूप संवेदना. ओम शांती.' सुहेलने खुलासा केला की, संजय इंग्लंडमध्ये पोलो मॅच खेळत होते. चुकून त्यांच्या घशात एक मधमाशी गेली. ज्यामुळे घशात वेदना झाल्या आणि त्यानंतर त्यांना हार्ट ॲटॅक आला. संजय कपूर एक पोलो टूर्नामेंट साठी यूके गेले होते.
संजय कपूरची कंपनी सोना कॉमस्टारने एक ऑफिशियल स्टेटमेंट देखील जारी करत त्यांच्या निधनाची माहिती दिली होती.
अभिनेत्री, खासदार कंगना राणौत यांनी विचित्र आणि दुःखद घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. सोशल मीडियावर तिने उद्योगपती संजय कपूर - अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती - यांच्याबद्दल एक हृदयद्रावक पोस्ट शेअर केली. पोलो सामन्यादरम्यान मधमाशी त्याच्या तोंडात गेल्याने, त्याला चावल्याने आणि त्याची श्वासनलिका बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
तिच्या पोस्टनुसार, खेळ थांबवण्याची विनंती केल्यानंतर काही क्षणांतच कपूरला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो पुन्हा जिवंत होऊ शकला नाही. "अशी दुःखद बातमी... २०२५ मध्ये आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व विचित्र घटनांचा अर्थ लावण्याचा माझा प्रयत्न संपला आहे," असे कंगनाने लिहिले. तिने सर्वांना "सुरक्षित राहा आणि देवाला प्रार्थना करत राहा" असे आवाहन करत संदेश लिहिला आहे.