

दंगल सिनेमातील गीताच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे झायरा वासिम. गेले काही दिवस लाईम लाइटपासून लांब असलेल्या झायराने सोशल मिडियावर कमबॅक केले आहे. आल्या आल्याच तिने लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेयर केली आहे. 'कुबूल है x3' हे कॅप्शन तिने शेयर केले आहे. या सगळ्या फोटोमध्ये तिने पतीचे नाव आणि चेहरा मात्र समोर आणलेला नाही. (Latest Entertainment News)
शेयर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये झायरा निकाहनाम्यावर सही करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत नवीन जोडी पाठमोरी दिसते आहे.
लग्नाच्या दिवसांसाठी झायराने लाल रंगाची निवड केली आहे. फोटोत तिने लाल ओढणी घेतली आहे. तर पतीने ऑफ व्हाइट शेरवानी आणि शाल घेतलेली आहे.
झायराने 2016 मध्ये दंगल सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सिनेमात तिने गीता फोगटच्या लहानपणीची भूमिका साकारली. या सिनेमासाठी तिने सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्रीसाठीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला. नितेश तिवारीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमाने ब्लॉकबस्टर सिनेमाचा मां मिळवला.
यानंतर तिने सीक्रेट सुपरस्टार या 2017 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातही ती दिसली होती. या सिनेमातही तिच्यासोबत आमीर खान दिसला होता. याशिवाय मेहेर वीज, राज अर्जुन यांच्या भूमिका होत्या.
झायराने 2019मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. करियरच्या सुरुवातीलाच असा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी तिने अभिनयक्षेत्र सोडत असल्याचे म्हणले होते. आपल्या पोस्टमध्ये तिने यावेळी म्हणले होते की, ‘ मी हे स्वीकारू इच्छिते की मी माझी ही ओळख आणि कामापासून आनंदी नाहीये. मला बऱ्याच काळापासून वाटत आहे की मी दुसरे काहीतरी बनण्यासाठी संघर्ष करते आहे.