औरत का चक्कर बाबूभैय्या! एका अभिनेत्रीसोबतच्या अफेअरमुळे साऊथच्या या दोन सुपरस्टार भावात वैर; 18 वर्षांचा अबोला

राम चरण हा अल्लू अर्जुनचा आत्येभाऊ आहे
Entertainment News
Allu Arjun Ram Charanpudhari
Published on
Updated on

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचे चाहते केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टिच नाही तर जगभरात आहेत. तर आरआरआर स्टाइलने प्रेक्षकांच्या गळ्यातल्या ताईत बनलेल्या रामचरणचे फॉलोविंगही जबरदस्त आहे. तुमच्यापैकी बऱ्याचजणांना हे माहीती असेल की राम चरण हा अल्लू अर्जुनचा आत्येभाऊ आहे. (Latest Entertainment News)

हे दोघेही एकमेकांसोबत नात्यात असले तरी गेली 18 वर्षे एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत. याला कारण आहे अभिनेत्री नेहा शर्मा. तीच नेहा शर्मा जिने इम्रान हाशमीसोबत क्रूक सिनेमात काम केले होते.

Entertainment News
TMKOC Daya Return: 'तारक मेहता का उलटा चश्मा'च्या चाहत्यांसाठी खुशखबर! दया भाभी परत येणार? असित मोदींसोबतच्या फोटोमुळे चर्चा

नेमका काय आहे अल्लू अर्जुन- नेहा- रामचरण यांच्या लव्ह ट्रँगलचा किस्सा?

2000 मधील बातम्यांनुसार अल्लू अर्जुनचे नेहासोबत अफेअर सुरू होते. त्यावेळी नेहा साऊथच्या सिनेमात बऱ्यापैकी दिसत होती. या जोडीचे अफेअर ऐन भरात होते की नेहाने अल्लूसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण तेव्हढयात नेहा आणि रामचरणचा चिरूथा हा सिनेमा रिलीज झाला होता. हे दोघेही पहिल्यांदाच एक सिनेमात दिसले होते.

पण अचानक रामचरण आणि नेहाने लग्न केल्याच्या अफवा उडू लागल्या. तसेच ते दोघे हनिमूनसाठी परदेशात असल्याचा अफवेनेही जोर पकडला. या दरम्यान अल्लूच्या असे लक्षात आले की, त्याच्या आणि नेहाच्या भांडणातही रामचा अदृश्य सहभाग होता. एकीकडे लग्नापर्यंत नाते पोहोचले असताना अशा अफवा समोर आल्याने अल्लू चांगलाच दुखवला गेला. तेव्हापासून त्याने रामचरणसोबत बोलणे बंद केले.

Entertainment News
Aamir khan : फैसलने हे पहिल्यांदाच केले नाही.... घरातल्यांवर भयंकर आरोप करणाऱ्या फैसलविरोधात आमिरच्या घरच्यांचे जाहीर पत्र

काय होती रामची प्रतिक्रिया?

नेहासोबत गुपचुप लग्न करण्याच्या अफवेबाबत रामचरणने एका मुलाखती दरम्यान खुलासा केला होता. त्यावेळी तो म्हणाला होता, ‘ मी एक विवाहित पुरुष आहे. अशा अफवा माझ्यात आणि पत्नी (उपासना) मध्ये गैरसमज निर्माण करू शकतात. पती म्हणून माझी ही जबाबदारी आहे की माझ्या पत्नीला इतर स्त्रियांबाबत मनात शंका राहील. चिरूथा माझा पहिला सिनेमा होता. या दरम्यान नेहासोबतच्या अफेअरच्या चर्चानी जोर पकडला होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी या अफवा फार गांभीर्याने न घेण्याचा सल्ला दिला होता.’

Entertainment News
Suyash Tilak Accident: अपघात काही मोठा झाला नाही बातम्या उगाचच तश्या करू नयेत; अभिनेता सुयश टिळक स्पष्टच बोलला

यानंतर रामचरणने 2012 मध्ये उपासनासोबत लग्न केले. या जोडीला आता एक मुलगी आहे. तर अल्लूनेही 2011 मध्ये स्नेहाशी लग्नगाठ बांधली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news