कंगनाच्या 'इमर्जन्सी'चा मार्ग मोकळा, सेन्सॉरकडून U/A प्रमाणपत्र

Emergency Movie : मंडळाने सुचवले दहा बदलांसह तीन कट्स
Emergency movie
कंगनाच्या इमर्जन्सी'चा मार्ग मोकळाPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपटाच्‍या प्रदर्शनाचा मार्ग माेकळा झाला आहे. सेन्सॉरने या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवत 'U/A' प्रमाणपत्र दिले आहे. मात्र, चित्रपटामध्ये 10 बदल आणि तीन दृश्‍यांना कात्री लावली आहे. (Emergency Movie)

Emergency movie
Emergency Movie : कंगनाच्या 'इमर्जन्सी' ची रीलीज डेट पुन्हा पुढे ढकलली

Emergency Movie| शीख संघटनेने चित्रपटावर घेतला होता आक्षेप

'इमर्जन्सी' हा चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता; परंतु, सेन्सॉरकडून प्रमाणपत्राअभावी ताे प्रदर्शित हाेवू शकला नाही.8 जुलै रोजीच निर्मात्यांनी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे प्रमाणपत्रासाठी सादर केला होता. मात्र एका महिन्यानंतर शिरोमणी अकाली दल आणि अनेक शीख संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सुरू केली होती. या परिस्थितीत सीबीएफसीने चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसला पत्राद्वारे तीन कट आणि त्यात सुमारे 10 बदल करण्याची सूचना केली होती.

चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट

'इमर्जन्सी' चित्रपटात कंगना राणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्‍या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'इमर्जन्सी' या चित्रपटामध्ये अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि महिमा चौधरीसारखे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 1975 ते 1977 या 21 महिन्यांच्या कालावधीत देशावर लादलेल्‍या आणीबाणीचा काळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. आता या चित्रपटाला सेन्सॉरकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लवकरच प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली जाईल अशी अपेक्षा आहे. (Emergency Movie)

Emergency movie
Emergency Movie |कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'वरून वाद सुरू

Emergency Movie| U/A प्रमाणपत्र म्हणजे काय ?

सेन्सॉर बोर्ड प्रादेशिक कार्यालय समितीने दिलेल्या अहवालानुसार 'U' प्रमाणपत्र असलेला चित्रपट हा सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी असतो. तर U/A प्रमाणपत्र मिळालेला चित्रपट पाहण्यासाठी 12 वर्षावरील मुलांना एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या सोबतच हा चित्रपट पाहण्‍याची परवानगी असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news