चियान विक्रमने हात पुढे केला पण, आराध्याने वाकून घेतले आशीर्वाद

Aradhya | आराध्याची भारावून टाकणारी कृती
Aradhya -Aishwarya-Chin Viram
आराध्याने चियान विक्रमचे घेतले आशीर्वादInstagram
Published on
Updated on

ऐश्वर्या राय-बच्चन लांब आहे. पण ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चनही नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. ऐश्वर्या कोणताही पुरस्कार सोहळा, विदेश दौऱ्यावर गेल्यानंतर नेहमीच आराध्याला तिच्यासोबत घेऊन जाते. आता सध्या सोशल मीडियावर आराध्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहून सर्वजर्ण ऐश्वर्याच्या लेकीचे कौतुक करताना दिसत आहेत.

नुकतेच दुबईमध्ये दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (एसआयएमए) सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आराध्याच्या वागण्याचे कौतुक नेटकऱ्यांकडून केले जात आहे. या व्हिडीओत अभिनेता शिवा राजकुमार आणि चियान विक्रमची भेट घेण्यासाठी ऐश्वर्या ही आराध्याला घेऊन जाते. आराध्याने प्रथम त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. शिवानेही आराध्याला आशीर्वाद दिले. आराध्याच्या वागण्यातील हा नम्रपणा पाहून ऐश्वर्याचा चेहराही फुलला. आराध्याचे संस्कार पाहून नेटकरीही तिचे कौतुक करताना दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news