Chitrangada Singh | नवाजुद्दीन सिद्दिकीसोबतच्या इंटिमेट सीनमुळे चित्रांगदा सिंहने सोडला होता चित्रपट

Chitrangada Singh |
Chitrangada Singh | नवाजुद्दीन सिद्दिकीसोबतच्या इंटिमेट सीनमुळे चित्रांगदा सिंहने सोडला होता चित्रपट
Published on
Updated on

चित्रांगदा सिंहने एका चित्रपटाचे शूटिंग अर्धवट सोडल्याची जुनी घटना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका वरिष्ठ मनोरंजन पत्रकाराने सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये या धक्कादायक प्रसंगाचा खुलासा केला आहे.

‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा प्रकार घडला होता. या चित्रपटात चित्रांगदा सिंह आणि नवाजुद्दीन सिद्दिकी मुख्य भूमिकेत होते. शूटिंग सुरू असताना दिग्दर्शकाने चित्रांगदाला नवाजुद्दीनसोबत एक अत्यंत जवळचा आणि इंटिमेट सीन (चुंबन दृश्य) देण्यास सांगितले; मात्र हा सीन ज्या पद्धतीने शूट केला जात होता, त्यामुळे चित्रांगदा कमालीची अस्वस्थ झाली होती. तिने या दृश्याला विरोध केला; पण दिग्दर्शकासोबत यावरून तिचे तीव्र मतभेद झाले. अखेर आपल्या स्वाभिमानाशी तडजोड न करता चित्रांगदाने सेटवरून निघून जाणे पसंत केले आणि चित्रपटच सोडला. नंतर तिच्या जागी बिदिता बाग या अभिनेत्रीला घेण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news