

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेते चिरंजीवी (Chiranjeevi) साऊथ मेगास्टार तर आहेच पण आपल्या शानदार अभिनयाने त्यांनी एक वेगळी ओळख बनवली आहे. सर्वात यशस्वी भारतीय कलाकारांपैकी एक चिरंजीवी यांनी हिंदी, तेलुगु, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी त्यांच्या सिनेकरिअरमध्ये १३२ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २२ ऑगस्ट रोजी चिरंजीवी आपला ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या जन्मदिनी जाणून घेऊया ते किती कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. (Chiranjeevi Net Worth)
चिरंजीवी यांनी आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात १९७९ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘पुनधिरल्लु’तून केली होती. त्यानंतर चिरंजीवीने कधी मागे वळून पाहिले नाही. त्याने आपल्या डेब्यू ईयरमध्ये १४ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. नव्वदच्या दशकात ते सर्वांधिक फी घेणारे अभिनेते ठरले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन एका चित्रपटासाठी ९० लाख रुपये फी घ्यायचे. पण, चिरंजवी यांनी अमिताभ यांचे रेकॉर्ड तोडले होते. १९९२ मध्ये रिलीज झालेला चित्रपट Aapadbandhavudu साठी त्यांनी १.२५ कोटी रुपये घेतले होते.
मेगास्टार चिरंजीवी साऊथच्या सर्वात महागे अभिनेत्यांपैकी एक आहेत. रिपोर्टनुसार, त्यांची संपत्ती जवळपास १६५० कोटी रुपये आहे. अभिनेता चित्रपटांशिवाय, बिझनेस, जाहिरात आणि इन्वेस्टमेंटमधून कमाई करतात. त्याशिवाय चिरंजीवीकडे अनेक महाग प्रॉपर्टीज आहेत. त्याच्याकडे हैदराबादमध्ये एक बंगला आहे. त्याची किंमत २८ ते ३० कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे अनेक लक्झरी कारदेखील आहेत. चिरंजीवीकडे रेंज रोवर वोग, मर्सिडीज-बेंज एएमजी जी क्लास, रोल्स रॉयस फँटम आणि टोयोटा लँड क्रुझर सारख्या गाड्यादेखील आहेत. त्याची महिन्याची कमाई ४ कोटी तर वार्षिक कमाई ५० कोटी रुपये आहे. चिरंजीवी हाएस्ट पेड ॲक्टर आहे. तो एका चित्रपटासाठी ४५ कोटी रुपये घेतो. त्याच्याकडे स्वत:चा पॅायव्हेट जेटदेखील आहे, त्याची किंमत आहे १९० कोटी रुपये आहे.