पुढारी ऑनलाईन डेस्क - तमिळ अभिनेता विजय थलापतीने गुरुवारी चेन्नई येथे त्यांचा पक्ष, तमिलगा वेत्री कळघम (TVK) च्या ध्वजाचे अनावरण केले. त्यांचा पक्ष सामाजिक न्यायाच्या मार्गावर जाईल, असे सांगितले. ध्वज वरच्या आणि खालच्या बाजूस लाल रंगाचा आहे आणि मध्यभागी पिवळा आहे, ज्यामध्ये दोन हत्ती आणि एक वागाईचे फूल आहे, जे विजयाचे प्रतीक आहे. TVK ने पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर ध्वजगीत देखील लाँच केले आहे.
ध्वजारोहण समारंभात बोलताना विजय म्हणाला की, टीव्हीके ध्वजाचे महत्त्व राज्यस्तरीय परिषदेत उघड केले जाईल. ही परिषद लवकरच होणार आहे. २ फेब्रुवारी रोजी, विजयने घोषणा केली होती की, जात-मुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासह "मूलभूत राजकीय बदल" करण्यासाठी आपण वचनबद्ध आहे. त्यावेळी त्याने TVK लाँच करण्याची घोषणा केली होती. तो म्हणाला की, पक्ष २०२६ ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवेल.