

Chiranjeevi Hanuman AI made movie announcement
मुंबई : चित्रपट इंडस्ट्रीत देखील आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ने पाऊल ठेवलं आहे. आनंद एल राय यांचा चित्रपट रांझणाच्या तमिळ व्हर्जन अंबिकापथीच्या क्लायमॅक्सला एआय ने बदलल्यानंतर खूप टीका झाली होती. आता एआयचा वापर करून बनवलेला चित्रपट 'चिरंजीवी हनुमान - द इटरनल'ची घोषणा करण्यात आलीय. या घोषणेनंतर नवा वाद निर्माण झालाय. ज्यावर दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनी कडक प्रतिक्रिया दिलीय.
प्रोडक्शन हाउस अबुंदंतिया एंटरटेनमेंटने चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करत लिहिले की, ''चिरंजीवी हनुमान - द इटरनल ची कहाणी एक अनोख्या Made in AI, Made in India अवतारात मोठ्या पडद्यावर आणणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमची संस्कृती, विरासत आणि इतिहासाच्या प्रती श्रद्धा सोबत हा चित्रपट हनुमान जयंती २०२६ मध्ये रिलीज केला जाईल.''
दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनी या घोषणेवर आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत लिहिले, 'आणि यासाठी सुरु झाले... जेव्हा सर्व काही ‘Made in AI’ आहे तर लेखक आणि डायरेक्टर्सची काय गरज आहे?'
मोटवानी यांनी याआधी अनेकवेळा एआयच्या वाढत्या उपयोगावर आक्षेप घेतला होता. 'मी एआय चित्रपट इंडस्ट्रीसाठी मोठा धोका मानतो. धोका हा वापर करणाऱ्या क्रिएटर्सपासून नाही तर पण त्या लोकांपासून जे पैसे वाचवण्यासाठी याचा वापर करू इच्छितात. ही वेगळी समस्या आहे.'
चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांनी 'चिरंजीवी हनुमान' या एआय-निर्मित चित्रपटाचे निर्माते विजय सुब्रमण्यम यांच्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, "अभिनंदन @vijaysubramaniam84. कलाकार, लेखक आणि दिग्दर्शकांचे प्रतिनिधीत्व करणारे ...विजय सुब्रमण्यम आता एआय द्वारा निर्मित एका चित्रपटाची निर्मिती करत आहेत."