

Aamir Khan - Jessica Hines updates
मुंबई - सुपस्टार आमिर खानचा भाऊ फैसल खानने मोठा आरोप केला आहे. फैसलने पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. त्यांनी हा दावा केला की आमिर खानचे जेसिका हाईन्स सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं आणि त्यांना एक मूल देखील आहे. जेसिका अखेर कोण आहे?
मेला चित्रपटात फैसल आणि आमिर खान यांनी एकत्र काम केलं होतं, ज्यामध्ये ट्विंकल खन्ना मुख्य भूमिकेत होती. पण सध्या त्यांच्यात वाद सुरु आहे. फैसलने फॅमिली आणि आमिरवर अनेक प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत फैसलने असे काही दावे केले आहेत की, त्याची चर्चा होऊ लागलीय.
फैसल खानने आरोप केले की, विवाहित असतानाही आमिरचे ब्रिटीश लेखिका जेसिका हाईन्स (Jessica Hines) नावाच्या परदेशी महिलेशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. आणि त्यांना जॉन नावाचा मुलगा देखील आहे.
फैसल खान म्हणाला- जेव्हा मी माझ्या परिवाराशी नाराज होतो, तेव्हा मी एक पत्र लिहिलं होतं, कारण त्यावेळी माझा परिवार माझ्यावर दबाव आणत होता की, लग्न कर. तर त्या पत्रात मी प्रत्येक फॅमिली सदस्याबद्दल लिहिले की, कोण काय आहे. जसे की निखत आहे, तिचे तीन वेळा लग्न झाले. आणि आमिर खानचे रीनासोबत लग्नानंतर घटस्फोट झाला. त्यानंतर आमिर जेसिका हाईन्ससोबत रिलेशनशीपमध्ये होता. त्यांना एक मुलगा देखील आहे. त्यांनी लग्न केले नव्हते. तेव्हा तो किरण राव सोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता.
याआधी फैसलने हा दावा केला होता की, आमिर आणि त्याच्या फॅमिलीने दीर्घकाळ त्याला घरात बंद ठेवलं होतं.
फैसल खानला घरात बंद करून ठेवण्याच्या आरोपावरून आमिरच्या फॅमिलीकडून वक्तव्य समोर आले होते. आता जेसिका प्रकरणावर आमिरकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.