Bardovi Movie | छाया कदम स्टारर 'बारदोवी' येतोय यादिवशी; थरारक अनुभवायला तयार राहा

'बारदोवी' चित्रपट यादिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
chhaya-kadam-movie bardovi
Instagram

पुढारी ऑनलाईन डेस्क : मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या "बारदोवी" या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला होता. या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवली. कसलेले अभिनेते, गुंतवणारं कथानक असलेला हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Bardovi Movie)

chhaya-kadam-movie bardovi
Kung Fu Panda 4 | कुंग फू पांडा -४ ला पसंती; दमदार चित्रपट पाहायला विसरु नका

"बारदोवी" या आगामी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं होतं. करण शिवाजीराव चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत "बारदोवी" या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. तर संतोष बळीराम तांबे, रवीराज शिवाजी वायकर, अभिजित सुमन वसंत पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत.

chhaya-kadam-movie bardovi
Appi Aamchi Collector | अप्पी- अर्जुन पुन्हा एकत्र येऊ शकतील?

'बारदोवी' चित्रपटात हे असणार कलाकार

छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत. तर विक्रम पाटील यांनी कॅमेरा, अरविंद मंगल यांनी प्रोडक्शन डिझाईन आणि विकास डीगे कार्यकारी निर्माता आहेत.

chhaya-kadam-movie bardovi
IFFM 2024 | अपारशक्ती खुराणा स्टारर 'बर्लिन' चा IIFM 2024 मध्ये होणार प्रीमियर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news