

Chala Hawa Yeu Dya to Return
मुंबई - लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे नव्या आणि दमदार रुपात. कॉमेडीचं गँगवॉर! आता प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. यंदा च्या कार्यक्रमात असणार आहेत धमाकेदार स्किट्स, गँगलॉर्ड्समध्ये रंगलेली बोलीची स्पर्धा, खास सेलिब्रिटींची हजेरी, आणि उत्साही प्रेक्षकांच्या सहभागासह एक हटके मनोरंजन!
या पर्वात श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भरत गणेशपुरे हे कलाकार असतील. यांच्यासोबत यंदा मंचावर उतरतील दमदार हास्यकलाकार गौरव मोरे आणि अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव. हे सगळे आता गँगलॉर्ड्सच्या भूमिकेतून नव्या कलाकारांना मार्गदर्शन करतील. त्यांना प्रशिक्षित करतील आणि एक धमाकेदार विनोदी टीम तयार करतील.
या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिजीत खांडकेकर सांभाळत आहे. प्रत्येक भागात गँगलॉर्ड्स म्हणजेच पाच मेंटॉर्सचे एक विशेष विनोदी सादरीकरण करतील ज्याने प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे. त्यासोबतच महाष्ट्रभरातून आलेले २५ विनोदी कलाकार महाराष्ट्राच्या मनोरंजनाचा विडा हाती घेणार आहेत.
ह्या पर्वाचे लेखन योगेश, लेखक अनिश गोरेगावकर, अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, अक्षय जोशी, पूर्णानंद वांढेकर आणि अमोल पाटील यांचे आहे. २६ जुलै पासून शनी - रवि रात्री ९ वा झी मराठीवर हा शो पाहता येईल.
video - Shreya Bugde Sheth Instagram वरून साभार