पुढारी ऑनलाईन
कल्पेश भांडारकर यांनी थोरले बंधू मधुर भांडारकर यांच्यासह अनेक दिग्गजांसोबत हिंदीत चित्रपट केले आहेत. आता ते स्वतःचा मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शनाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. 'चाबुक' असे या चित्रपटाचे नाव असून 25 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांच्यासुद्धा भूमिका आहेत. आत्मपरीक्षणाचा सणसणीत 'चाबुक' जर वेळीच ओढला गेला तर त्याचा नक्कीच फायदा होतो हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे.