

मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेने थ्रो-बॅक फोटोज शेअर करत ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने पोस्टमध्ये म्हटलंय-अप्रतिम deepti pillaysivan दिग्दर्शित achappa salbum या मल्याळम चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान तिरुवनंतपुरममधील माझ्या दिवसातील काही थ्रोबॅक फोटोज. FYI या चित्रपटाचे संगीत आणि हा सुंदर ट्रॅक एकमेव gulraj singh यांनी संगीतबद्ध केला आहे. हे चित्र माझ्या प्रिय मित्राने आणि सह-अभिनेत्री priyanka nairo fficial च्या सौजन्याने क्लिक केले आहे ज्यांच्या सौजन्याने मला padmanabhaswamy temple ला भेट देण्याचा आणि दैवी अनुभव घेण्याचा बहुमान मिळाला.
पारंपरिक लूकमध्ये आरिन दिसतेय आईची कार्बन कॉपी
आमिर खानच्या ‘गजिनी’पासून सलमान खानसोबतच्या ‘रेडी’पर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री असिन थोट्टूमकल सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. असिन इतर अभिनेत्रींच्या तुलनेत सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नसते. ती सोशल मीडियावर आलीच तर बहुतांश वेळा आपल्या मुलीचे फोटो किंवा तिच्याशी संबंधित झलक चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. आता ओणमच्या निमित्ताने असिनने लेक आरिनचे काही नवे फोटो चाहत्यांना दाखवले आहेत.
यावेळी असिनने हे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आरिन फुलांच्या मदतीने रांगोळी साकारताना दिसत आहे. दुसऱ्या एका झलकमध्ये ती आपल्या वडिलांसोबत खेळताना आणि मस्ती करताना दिसते. आरिनचा पारंपरिक दक्षिण भारतीय पोशाखातील लूकही लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंमध्ये आरिन अगदी आई असिनसारखीच दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि गोडवा पाहून ती आईची हुबेहूब कॉपी असल्याचं म्हणावं लागेल. पारंपरिक वेशभूषेत आरिन खूपच सुंदर दिसत असून तिच्या या झलक चाहत्यांच्याही पसंतीस उतरल्या आहेत.
तमन्नाने सुंदर साडीत व्हिडिओ शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं- पांढऱ्या शुभ्र वस्त्रांत नटलेली आणि दागिन्यांनी सजलेली ही ओणमची वेळ अधिकच मंगलमय वाटत आहे, ओणमच्या शुभेच्छा.
ओणम सणाच्या वेळी मलायकाचा बॉयफ्रेंड हर्ष मेहता तिच्या घरी आला होता. यावेळचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मलायका अरोरापेक्षा १९ वर्षांनी लहान डायमंड मर्चंट हर्ष मेहता. २६ ऑगस्ट रोजी तिने तिच्या आईच्या घरी ओणम साजरा केला. ओणमच्या सेलिब्रेशन दरम्यान मलायका अरोराचा बॉयफ्रेंड तिच्या घरी दिसला होता.