पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी मराठी वाहिनीवरील आणि अल्पावधीत प्रेक्षकांच्या पंसंतीस उतरलेली मालिका म्हणजे 'बॉस माझी लाडाची'. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणाऱ्या मिहीर आणि राजेश्वरीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. लवकरचं ते मालिकेत विवाहबंधनात अडकणार आहेत.
सोनी मराठी वाहिनीवरील 'बॉस माझी लाडाची' या मालिकेतील मिहीर (आयुष संजीव) आणि राजेश्वरी ( भाग्यश्री लिमये ) हे मालिकेत विवाहबंधनात अडकणार आहेत. या मालिकेत एम्प्लॉयी मिहीर आणि बॉस राजेश्वरी या दोघांची हटके अशी केमिस्ट्री दाखवली आहे. सतत होणारी दोघांची शाब्दीक चकमक, एक डिल म्हणून होणार लग्न, प्रेमाचं खोट नाटक आणि हे आपलं खोटं लोकांना समजू नये म्हणून होणारी दोघांची तारांबळ या मालिकेत दाखवली आहे.
अनेक ट्विस्टनंतर अखेर मिहीर आणि राजेश्वरी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या मालिकेत दोघांनी लग्नाआधीचे सविधी केले आहेत. दोघांनी मराठमोळ्या वेशभूषेत प्री वेडींग शूट केले आहे. हे फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. मेहंदीचे खास क्षणाचेही फोटोज चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. सोशल मीडियावर माहिराज असा हॅशटॅग सुरु आहे.
'बॉस माझी लाडाची' या मालिकेत राजेश्वरीची भूमिका करणारी भाग्यश्री लिमये ही 'घाडगे अँड सून' या मालिकेतील अमृता प्रभुणे या भूमिकेमूळे घराघरात पोहचली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली होती.