

बॉर्डर २ चे जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन २०० कोटींच्या पार झाले आहे. सनी देओलच्या चित्रपटाला विकेंडचा आणि प्रजासत्ताक दिनाचा खूप फायदा झालेला दिसला. चित्रपटाने सिकंदर आणि रेड २ च्या एकूण कमाईला देखील मागे टाकले आहे.
Sunny Deol Border 2 box office collection day 4
सनी देओल स्टारर बॉर्डर-२ बॉक्स ऑफिसवर उतरताच धुमाकूळ घातला आहे. निर्मात्यांनी या आठवड्यातच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट रिलीज केला आहे. त्यामुळे त्याचा फायदा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यासाठी होत आहे. रिलीज झाल्यापासून पहिल्या दोन दिवसातच तुफान कमाई करण्याच बॉर्डर २ यशस्वी ठरला. विकेंडला रविवारी कमाईची गती कायम राहिली. तर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा फायदा देखील चित्रपटाला झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, १९९७ चा वॉर ड्रामा बॉर्डरचा हा सीक्वेल आहे. ५१ कोटी रुपये तिसऱ्या दिवसाची कमाई ठरली आहे. प्रत्येक तासाला कमाईचे आकडे वाढलेले दिसतात. प्रजासत्ताक दिनी जबरदस्त कमाई केली, देशांतर्गत ५९ कोटींहून अधिक रुपयांची कमाई चित्रपटाने केली आहे.
ओपनिंग डेला बॉर्डर २ ने ३० कोटींचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ३६.५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पहिल्या दिवसाची कमाई पाहता आदित्य धरच्या धुरंधर चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले. तर चौथ्या दिवशी रेड-२ आणि सिकंदरलाही बॉर्डरने मागे टाकले आहे. रिलीजच्या अवघ्या चार दिवसांतच, युद्धपट 'बॉर्डर २' ने आंतरराष्ट्रीय स्तरावर २५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
बॉक्स ऑफिस कलेक्शन (भारत)
पहिला दिवस : ३० कोटी
दुसरा दिवस : ३६.५ कोटी
तिसरा दिवस : ५१ कोटी
चौथा दिवस-५९ कोटी
एकूण : १८० कोटी
रिपोर्टनुसार, 'Border 2' ची रविवारी २५ जानेवारी रोजी एकूण ३१.४६% हिंदी ऑक्युपेंसी (occupancy) ठरली आहे. तर पहिल्या आठवड्यात भारतात १८० कोटी रुपये कमाई केली आहे. या चित्रपटाचे सकाळचे अनेक शो रद्द होऊनही 'बॉर्डर २' ने चांगली सुरुवात केली होती. रविवारनंतर वर्ल्डवाईड मार्केटमध्ये चित्रपटाची कमाई ४.३ दशलक्ष डॉलर्सच्या आसपास पोहोचली आहे. यामुळे चार दिवसांनंतर चित्रपटाची वर्ल्डवाईड कमाई २५१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
बॉर्डर २ ने सिकंदर, रेड २ ला मागे टाकले
सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाने १८४ कोटी तर अजय देवगणच्या 'रेड २'ने २४३ कोटी रुपये मिळवले होते. अनुराग सिंग यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सनी देओलशिवाय वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. शिवय, मोना सिंह, अनया सिंह, मेधा राणा, सोनम बाजवा, परमवीर चीमा, अनुराग अरोरा, वंश भारद्वाज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.