लाईव्ह शोमध्ये अभिनेत्री मिमी चक्रवर्तींसोबत गैरवर्तनाचा आरोप, आयोजकांविरोधात पोलिसांत तक्रार

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि माजी टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे.
bengali actress mimi chakraborty
लाईव्ह शोमध्ये अभिनेत्री मिमी चक्रवर्तींसोबत गैरवर्तनाचा आरोप, आयोजकांविरोधात पोलिसांत तक्रारFile Photo
Published on
Updated on

bengali actress mimi chakraborty faced harassment during stage performance filed police complaint

पुढारी ऑनलाईन :

अभिनेत्री मिमी चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करत त्यांनी कार्यक्रम आयोजकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

bengali actress mimi chakraborty
Padma Awards 2026 : आर्मिडा फर्नांडिस, अंके गौडा यांच्यासह ४५ जणांना पद्म पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि माजी टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना त्रास देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून, याप्रकरणी आयोजकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्रीबरोबर घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

मिमी चक्रवर्तींसोबत नेमकं काय घडलं?

एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की अभिनेत्री व माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बोंगाव येथे झालेल्या एका स्टेज कार्यक्रमादरम्यान त्यांच्या सोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

bengali actress mimi chakraborty
Mouni Roy Harassment: "कंबरेवर हात ठेवला, अश्लील हावभाव केले..."; भर कार्यक्रमात मौनी रॉयसोबत गैरवर्तन, पाहा व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी बोंगाव शहरातील नयाग्राम भागात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात घडली. मिमी यांच्या तक्रारीनुसार, कार्यक्रम सुरू असतानाच आयोजकांपैकी एक तन्मय शास्त्री अचानक स्टेजवर चढला आणि जबरदस्तीने त्यांचा कार्यक्रम थांबवला. त्यानंतर मध्यरात्री त्यांना स्टेजवरून खाली उतरण्यास सांगण्यात आले.

या प्रकारामुळे आपल्याला खूप अपमानित वाटल्याचे मिमी यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी ई-मेलद्वारे बोंगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती त्यांनी सोशल मीडियावरही दिली, ज्यामुळे हा विषय सर्वांच्या लक्षात आला. अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये या घटनेमुळे नाराजी आणि संताप पाहायला मिळत आहे.

आयोजकांनी आरोप फेटाळले, दिली स्वतःची बाजू

दुसरीकडे, कार्यक्रमाचे आयोजक ‘युवक संघ क्लब’ यांनी मिमी चक्रवर्ती यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते, मिमी कार्यक्रमासाठी ठरलेल्या वेळेपेक्षा जवळपास एक तास उशिरा पोहोचल्या होत्या.

ज्या तन्मय शास्त्री यांच्यावर मिमी यांनी गैरवर्तनाचा आरोप केला आहे, त्यांनी हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. आपल्या स्पष्टीकरणात ते म्हणाले की, या कार्यक्रमाला केवळ मध्यरात्री १२ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली होती. परिसरात विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षांचा विचार करून कार्यक्रम थांबवण्यात आला. या दरम्यान मिमी चक्रवर्ती यांच्याशी कोणतेही गैरवर्तन किंवा छळ करण्यात आलेला नाही. त्यांचे सर्व आरोप चुकीचे आहेत.

तन्मय शास्त्री यांनी उलट आरोप करत म्हटले की, मिमी यांच्या बाऊन्सर्सनीच त्यांच्या सोबत गैरवर्तन केले. क्लबच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की, रात्री ११:४५ वाजता कार्यक्रम सुरू झाला तेव्हा क्लबच्या महिला सदस्य मिमी यांचे स्वागत करण्यासाठी स्टेजवर गेल्या होत्या. मात्र अभिनेत्रीच्या बॉडीगार्ड्सनी त्या महिलांना जबरदस्तीने स्टेजवरून खाली उतरवले.

तन्मय शास्त्री पुढे म्हणाले, “पोलिसांनी आम्हाला केवळ रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रमासाठी परवानगी दिली होती. मिमी स्वतः एक तासाहून अधिक उशिरा आल्या. त्या मोठ्या स्टार आहेत हे आम्हाला मान्य आहे, पण जर आम्ही मध्यरात्रीनंतर कार्यक्रम सुरू ठेवला असता, तर पोलिसांनी स्वतः येऊन कार्यक्रम बंद केला असता आणि आमच्यावर कायदेशीर कारवाई झाली असती.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news