Usha Nadkarni | 'डोक्यात मुंग्या यायच्या'.. उषा नाडकर्णींना कोणत्या शोमधून बाहेर पडल्यावर असं वाटत होतं?

Usha Nadkarni - 'या' रिॲलिटी शोमध्ये जाणे किती खतरनाक होतं, उषा नाडकर्णींना आठवत नव्हता स्वत:चा मोबाईल नंबर, अनुभव केले शेअर.
image of
Actress Usha Nadkarni shared experience about reality show Instagram
Published on
Updated on

Usha Nadkarni shared experience about reality show

मुंबई : हिंदी असो वा मराठी बिग बॉस, या रिॲलिटी शोमध्ये जाणे आणि टिकून राहणे तितकेच महत्त्वाचे असते. इतकचं नाही तर बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर अनेक स्टार्स आपापले अनुभव सांगताना दिसतात. आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आपले 'बिग बॉस मराठी' शोमधील त्यांचे अनुभव शेअर केले आहेत.

अनेक मराठी हिंदी-मालिका, चित्रपटांतून काम करणाऱ्या उषा नाडकर्णी ‘बिग बॉस मराठी सीजन १’मध्ये स्पर्धक म्हमून सहभागी झाल्या होत्या. आता त्यांना ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ मध्ये पाहण्यात आलं. एका मुलाखतीत त्यांनी ‘बिग बॉस मराठी’शी संबंधित अनुभव शेअर केले आहेत.

image of
Urfi Javed Emotional Post | उर्फी जावेदची भावनिक पोस्ट, म्हणाली, “व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर, नकार पचवणं कठीण असते”

काय म्हणाल्या उषा नाडकर्णी?

उषा नाडकर्णी म्हणाल्या, बिग बॉसच्या घरात राहणारे लोक वेडे होतात. शोमधून बाहेर आल्यानंतर सगळं विसरायला झालं होतं. एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की, जेव्हा तुम्ही ‘बिग बॉस’मधून बाहेर आला होता, तेव्हा कसा अनुभव होता. यावर उषा यांनी सांगितलं की, “बिग बॉसचे ते ७७ दिवस, वेडी झाले होते.… मेंदूत किडे पडले होते. सर्वांना असं होतं की नाही माहिती नाही. पण, मला तर असाच अनुभव आलाय.”

image of
Preity Zinta | ‘मॅक्सवेलशी तुझं लग्न झालं नाही म्हणून…’ : चाहत्‍याच्‍या प्रश्नावर प्रीती झिंटा भडकली; म्हणाली, ‘कृपया लिंगभेद ...’

स्वत:चा मोबाईल नंबरच विसरले : उषा नाडकर्णी

त्या म्हणाल्या, जेव्हा शोमधून बाहेर पडल्या तेव्हा स्वत:चा टेलिफोन नंबर लक्षात नव्हता. फोन कसा करायचा विसरले होते. सर्व काही विसरले होते. कारण तुमचा जगाशी संपर्क राहत नाही. तो अनुभव खूपचं खराब होता. पुन्हा बोलावलं तर जाणार नाही. तेथूनचं नमस्कार करून परत आले होते.

जेव्हा मी घरी गेले तेव्हा भावाने दरवाजा उघडला होता. तेव्हा मी विचारलं, 'हा हॉल छोटा का झाला?' भाऊ म्हणाला, 'तू आत ये. मोठ्या घरात राहून आली आहेस, तर तुला छोटं दिसणार.'

उषा नाडकर्णी यांची पवित्रा रिश्ता मालिकेतील सविता ताई ही भूमिका गाजली होती. सुशांत सिंह राजपूत-अंकिता लोखंडे यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news