Bollywood Script Writers: बॉलिवूडमध्ये कामाचा 'दुष्काळ', नवीन प्रोजेक्ट मिळत नसल्याने स्क्रिप्ट रायटर परतायत गावी

Bollywood Script Writers Fight Mental Health | बॉलिवूडमध्ये नवीन काम मिळत नसल्याने स्क्रिप्ट रायटरना पुन्हा गावी परतावे लागत आहे.
image of Movie theaters
हिंदी चित्रपट इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याने स्क्रिप्ट रायटर्स आपापल्या गावी परतावे लागत आहेPudhari file photo
Published on
Updated on

Bollywood Script Writers Fight Mental Health

मुंबई : बॉलिवूडमधील अनेक स्क्रिप्ट रायटर्स, लेखक एका वेगळ्या अडचणीतून जात आहेत. हिंदी चित्रपट इंडस्ट्रीत नवीन प्रोजेक्ट मिळत नसल्याने स्क्रिप्ट रायटर्स आपापल्या गावी परत जात असल्याची माहिती 'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया' (THR) या वेबसाईटने दिलीय. बॉलिवूडमध्ये स्क्रिप्ट रायटर्सना काम मिळत नाहीये. इतकी मंदी जाणवतेय की, स्क्रिप्ट रायटिंगसारखे काम करणाऱ्या लेखक वर्गाला याचा मोठा फटका बसलाय. अनेक प्रोडक्शन्समध्ये कामाची मंदी आहे. तर अनेक जे चित्रपट पूर्ण झाले आहेत, ते प्रदर्शित होण्याची केवळ प्रतीक्षा केली जात आहे. स्क्रिप्ट रायटर्स यांच्या पुढे आता नवीन प्रोजेक्ट मिळत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लेखक आहे ती नोकरी सोडून गावी परत जात आहेत तर काहींनी उदरनिर्वाहासाठी नवीन मार्ग निवडलेत.

पैसे मिळेना, संघर्ष संपेना

कोरोनानंतर बॉलिवूडला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. बॉक्स ऑफिसवर हिंदी सिनेमांना छप्परफाड कमाई करता आलेली नाही. ज्यांना हप्त्याने पैसे मिळतात, आता ते विना वेतन आहेत. आता लेखक इतर शहरांमध्ये स्थलांतर करत आहेत, जिथे राहणे परवडेल वा घराचे भाडे कमी असेल. काही लेखक आता इन्स्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर झाले असून त्यांचा भर ब्रँड कोलॅबवर त्यांचा भर आहे. काहींनी जाहिरातींसाठी जिंगल लिहिणे वगैरे काम सुरु केले आहे. पूर्वीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही प्राथमिक स्रोत शोधत आहोत. पण पटकथा लेखन नको, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका चांगल्या पटकथा लेखकाने सांगितलं. Ghost writer म्हणजेच स्वत:च्या नावाऐवजी इतरांसाठी कथा लिहिणाऱ्या लेखकांनाही आता 'अच्छे दिन' नाहीत.

पटकथा लेखक संजीव तिवारी यांनी त्यांची डेटा विश्लेषकसारखी चांगली नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये पटकथा लेखक म्हणून करिअर केले. ते म्हणाले, कोविड १९ महामारी वेळी गुरुग्राममध्ये ते डेटा विश्लेषक म्हणून नोकरी करायचो. ती नोकरी सोडून बॉलीवूडमध्ये पूर्णवेळ पटकथा लेखक म्हणून त्यांनी नवं करिअर निवडलं. एक वर्षापूर्वी मुंबईत येऊन एका मित्रासोबत स्क्रिप्टवर काम करणं सुरु केलं. सहाय्यक लेखक म्हणून काम केलं. तिवारी यांनी हॉलीवुड रिपोर्टर इंडिया सांगितलं की, "मी सातत्याने कामाची प्रतीक्षा करत होतो. त्याच आधारे मला कायमचे मुंबईत स्थायिक व्हायचं होतं, पण मला ते कधी मिळू शकलं नाही. ती अशी वेळ होती की, जेव्हा या उद्योगात मंदीचा काळ सुरु होता."

तिवारी हे अशा पटकथा लेखकांपैकी आहेत, ज्यांनी मुंबई सोडलीय. त्यांनी झारखंड येथील झुमरी तेलैया ठिकाणी गृहवापसी केलीय. या लेखकांना सध्या कामाच्या शोधात संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे नव्या लेखकांना तरी काम मिळवणं आव्हानचं बनले आहे. मी दोन वर्षांपूर्वी मुंबई जाण्यासाठी खूप इच्छुक होतो. पण आता मी सर्वांना सावधानतेने जाण्याचा सल्ला देतो, अशी व्यथा तिवारींनी व्यक्त केलीय.

मिसेस अँड आर्यासाठी ओळखल्या जाणारे अनु सिंह चौधरी म्हणाले की, बॉक्स ऑफिसवर कटेंट कमी हिट तसेच OTT वरील अनेक सीरीजच्या हिट्स मंदीचे कारण असू शकते. चौधरी म्हणाल्या, "मागील २ वर्षांमध्ये खरंच काम संपुष्टात आले आहे. इंडस्ट्रीचे तीन मुख्य उत्पन्न मिळवणारे सिनेमा, ओटीटी आणि टीव्हीने आपल्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केलीय. अन्य काही गोष्टमध्येही मोठी कपात केलीय. खूप सारे टॉप-लाईन बजेट जैसे थे आहेत. याचे नुकसान कुणाला होत आहे? पिरॅमिडच्या सर्वात खालच्या स्तरात राहणाऱ्या लोकांना. आधीच काम कमी आहे आणि त्यात वेतन कपात होत आहे."

चौधरी म्हणाल्या, या पदावर त्यांना काम मिळू शकतं. त्या मागील काही अडीच वर्षांपासून एका मोठ्या चित्रपटावर काम करत होत्या, आता कुठे जाऊन त्या स्क्रिप्टला मंजूरी मिळालीय. त्या काळात तुम्हाला पैसे दिले जात नाहीत. आठ महिन्यांची पेमेंट टाईमलाइन असेल तर त्यासाठी आता तीन वर्ष लागतायंत. तुम्ही कोणत्याही उत्पन्नाशिवाय अशा प्रकारे अडथळ्यांमध्ये अडकले आहात."

image of Movie theaters
Comedian Abhishek Upmanyu | पाकिस्तानी युजरला समर्थन देणं पडलं भारी, स्टँडअप कॉमेडियन अभिषेक उपमन्युने एक्स अकाऊंट केलं डिॲक्टिवेट

नेटफ्लिक्सच्या IC 814: The Kandahar Hijack आणि Tooth Pari च्या लेखनासाठी ओ‍ळखले जाणारे रुपल रशोमनी केवल्य म्हणाले की, ''जानेवारीपासून त्यांच्याकडे एकच पटकथालेखन कॉल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील शोसाठी आले आहे. परंतु प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी आणखी दोन महिने लागतील. इथे कामाच्या बाबतीत अनिश्चितता आहे आणि लेखक म्हणून, तुम्हाला भाडे आणि इतर खर्च भागवेल, असे कुठले तरी side hustle हवे, जे मुंबईसारख्या शहरात सर्वात जास्त आहे."

मानसिक अस्वास्थ्य आणि सातत्याने चिंता

चौधरी म्हणाल्या, "मी एका तरुण लेखकाच्या कॉलवर होतो जो जवळजवळ आत्महत्या करणार होता. हे खूप भयावह आहे; आम्ही त्या टप्प्यावर आलो आहोत आणि आता एक भयानक, अंधारलेला काळ सुरु आहे." पटकथा लेखक बनणण्यासाठी वेगवेगळ्या व्यवसायातून आलेले लोक आता शांतपणे त्यांच्या जुन्या नोकऱ्यांकडे कसे परत जात आहेत.

रुपल रशोमनी केवल्य म्हणाले की, त्यांनी चार साथीदारांना मुंबई सोडण्यापासून रोखले. कारण त्यांच्याकडे काम नव्हतं. परिस्थिती नक्कीच बदलेल, असे त्यांनी वचन दिलं. "मी मागील वर्षी दोन वर्षांमध्ये खूप काही लिहिलंय, परंतु, त्यासाठी मला पुरेसे पैसे मिळाले नाहीत. एका मोठ्या स्ट्रीमरने माझे दोन शो बंद केले. तुमचे काम समोर रिलीज होत नसेल तर तुम्हाला नवे काम मिळत नाही. हा विचारचं इतका भयावह आहे की, यामुळे खूप निराशा येऊ शकते. तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते."

"आता, ते अशा स्थितीत आहेत की, आपल्या कन्सल्टिंग जॉबवर परत जाऊ शकत नाहीत आणि आपल्या साथीदारांपेक्षा खूप मागे आहेत. काही वकील पटकथा लेखक बनण्यासाठी मुंबईत आले होते, पण ते आता आपपल्या नोकरीत परतले. हे खूपचं दु:खद आहे. अनेक महत्वाकांक्षी पटकथा लेखक जे पत्रकार होते, ते वापस जात आहेत, कॉलम लिहित आहेत, संशोधन करत आहेत. अनेक जण लेखक शोधत आहेत, पण त्यांना देण्यासाठी पैसे नाही."

चौधरी यांनी सांगितलेल्या या सर्व गोष्टींचे समर्थन एकाने केले. मानसिक स्वास्थ्यविषयी म्हणाले, "आम्ही जे काम करतो, ते खूप अंतरंग आहे. याचा परिणाम विविध प्रकारे होते. आम्ही सातत्याने आमच्या भावनांशी खेळतोय. असुरक्षिततेची भावना वाढलीय. जर लेखक चांगल्या मानसिक स्थितीमध्ये नसेल तर वेळेवर स्क्रिप्ट मिळणार नाही. आमच्यापैकी अनेकजण चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. कारण ते चिंतेत आहेत.

पटकथालेखक सुदीप निगम यांना वाटते की, समस्या केवळ थिएटर मार्केट कमी झाली आहे किंवा ओटीटी स्पेसला फटका बसला आहे असे नाही, तर लेखकांचे करार आतापर्यंत सर्वात खालच्या स्तरावर आहेत.

image of Movie theaters
Family Man 3 Actor Rohit Basfore Found Dead | अभिनेता रोहित बासफोरचा मृतदेह धबधब्याजवळ मिळाला, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

बॉलीवूडसाठी त्रासदायक

स्क्रिनरायटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SWA) च्या कॉन्ट्रॅक्ट कमिटीचे अध्यक्ष अंजुम राजाबली म्हणाले की, सततच्या कामाच्या अनिश्चिततेमुळे तरुण लेखकांना असुरक्षित वाटत आहे. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांकडे नोकऱ्या नाहीत. त्यामुळे सध्याच्या वातावरणात टिकून राहणं कठीण झाले आहे. कोणीही लेखकांना सुरक्षेची हमी देत नाही. ही निराशा, उद्विग्नता, वेदना आता रागात रूपांतरित होत आहे. याचा बॉलिवूडला त्रास होऊ शकतो. जेव्हा तुम्हाला चित्रपट बनवायचा असेल, तेव्हा तुम्हाला कथांची गरज भासेल आणि मग हा राग दिसून येईल. तेव्हा आम्हाला हे महागात पडणार आहे."

राजबली म्हणाले, SWA मिनिमम बेसिक कॉन्ट्रॅक्ट (MBC) साठी लढत आहे, ज्यामध्ये पूर्ण स्क्रिप्टसाठी किमान शुल्क म्हणून १३ लाख, कथेसाठी ४ लाख, पटकथेसाठी ५ लाख आणि डायलॉगसाठी 4 लाखांचा समावेश आहे. पण ते इतके सोपे राहिलेलं नाही. यातून केवळ संताप वाढेल. जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये न्यायालयीन वाद झाला तर त्याचा बचाव करणे आणि नुकसान भरपाई करणे लेखकावर अवलंबून आहे.

अशा संकटातून बाहेर येण्यासाठी कोणी काय करू शकतो. काहींसाठी प्रतीक्षा हा पर्याय असला तरी चौधरी यांच्यासारख्या अनेकांना प्रश्न पडतो की, दुसरीकडे काम शोधलं काहीतरी चांगले होईल का?

अनु सिंह चौधरी म्हणाले, "जर मला अस्वस्थ वाटत असेल तर ते काम सोडून द्यावे. ज्यांच्याकडे सपोर्ट सिस्टीम नाही अशा लोकांचे काय होईल? मला कधी कधी वाटते की, मी माझी पीएचडी करण्यासाठी परत जावे का आणि मी निरोगी असेन का. तुम्हाला ते किती सहन करावे लागते? याची किंमत काय आहे? हे तुम्हीच सर्वस्वी जाणता."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news