Bollywood : इमरान हाश्मीच्या टेस्ट रिपोर्टमध्ये आढळला 'हा' आजार; सोशल मीडिया पोस्टद्वारे दिले हेल्थ अपडेट

इमरान हाश्मींच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी; शो झाला पोस्टपोन
Bollywood
Bollywood : इमरान हाश्मीच्या टेस्ट रिपोर्टमध्ये आढळला 'हा' आजार; सोशल मीडिया पोस्टद्वारे दिले हेल्थ अपडेटfile photo
Published on
Updated on

bollywood emraan hashmi tests swine flu positive h1n1 postponement bengaluru show postponed

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांना आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. इमरान नुकतेच कामानिमित्त रांची आणि इतर ठिकाणी गेला होता. या प्रवासावरून परतल्यानंतर त्याला प्रकृती अस्वस्थ वाटत होती. त्यानंतर त्याने वैद्यकीय तपासणी करून घेतली असता त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे समोर आले.

Bollywood
Nepal Flood : नेपाळच्या पुरात वाहून आला बँकेचा लॉकर, लोकांनी तोडून काढले ९२ लाख रुपये; २९ जणांना अटक

तब्येत बिघडल्यामुळे इमरान हाश्मीला त्याचा बेंगळुरू येथील शो पुढे ढकलावा लागला आहे. ‘आवारापन-2’ आणि ‘टायगर-3’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला इमरान सध्या ‘आवारापन-2’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

इमरान हाश्मीने सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटले?

इमरान हाश्मीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बेंगळुरूमधील चाहत्यांसाठी एक खास संदेश शेअर केला. त्याने लिहिले की, त्याची तब्येत सध्या अजिबात ठीक नाही. त्यामुळे तो बेंगळुरूतील शोला उपस्थित राहू शकणार नाही. मात्र, हा कार्यक्रम रद्द झालेला नसून पुढे ढकलण्यात आला आहे.

इमरानने सांगितले की, तो 12 सप्टेंबर (शनिवार) रोजी सनबर्न युनियनमध्ये चाहत्यांची भेट घेईल. तसेच, आधीच्या तारखेची तिकिटे नवीन तारखेसाठीही वैध राहतील, असे त्याने स्पष्ट केले.

Pudhari

टेस्ट रिपोर्टमध्ये स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह

सोशल मीडियावर इमरान हाश्मीच्या टेस्ट रिपोर्टची छायाचित्रेही व्हायरल होत आहेत. या रिपोर्टमध्ये त्यांचा इन्फ्लुएंझा आणि स्वाइन फ्लूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येत आहे.

Bollywood
CM Vijay Thalapathy : अचानक तुरुंगात का गेले मुख्यमंत्री विजय थलपती? कैद्यांना भेटून म्हणाले..

डॉक्टरांनी काय सल्ला दिला?

‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी इमरान हाश्मीला आवश्यक ती खबरदारी घेण्यास, वेळेवर औषधे घेण्यास आणि पुरेसा आराम करण्याचा सल्ला दिला आहे. इमरानच्या तब्येतीबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. आता सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याने स्वतःच चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

‘आवारापन-2’मुळे चर्चेत

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, इमरान हाश्मी सध्या ‘आवारापन-2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. आता ‘आवारापन-2’बाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इमरान हाश्मी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news