Nepal Flood : नेपाळच्या पुरात वाहून आला बँकेचा लॉकर, लोकांनी तोडून काढले ९२ लाख रुपये; २९ जणांना अटक

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे हाहाकार उडाला असताना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनाही समोर आल्या आहेत.
Nepal Flood
Nepal Flood : नेपाळच्या पुरात वाहून आला बँकेचा लॉकर, लोकांनी तोडून काढले ९२ लाख रुपये; २९ जणांना अटकfile photo
Published on
Updated on

bank locker washed in by nepal floods people broke it open took out 92 lakh cash 29 arrested

पुढारी ऑनलाईन : Nepal Flood Updates : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे हाहाकार उडाला असताना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनाही समोर आल्या आहेत. रसुवा परिसरातून भोटेकोशी नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून त्रिशूली नदीपर्यंत आलेला बँकेचा लॉकर फोडून त्यातील पैसे चोरल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 29 जणांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका मृत महिलेच्या कानातील सोन्याच्या बाळ्या चोरल्याच्या आरोपावरून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Nepal Flood
CNG Price Hike : CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी..

रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी परिसरातून पुराच्या वेगवान प्रवाहात बँकेची एक जड तिजोरी वाहून गेली होती. त्यानंतर हा लॉकर धादिंग जिल्ह्यातील गल्छी गावपालिका-4 येथील बेलखूखोला परिसरातील त्रिशूली नदीच्या काठावर वाहून आला. धादिंग पोलिसांना नदीकाठी पडलेला हा लॉकर स्थानिक लोक तोडून त्यातील पैसे काढत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच नेपाळ पोलीस आणि सशस्त्र प्रहरी बलाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी छापा टाकला.

92 लाखांहून अधिक नेपाळी रुपये जप्त

पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळावरून 29 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 92,68,505 नेपाळी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. धादिंग पोलिसांच्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या बहुतांश आरोपींचे वास्तव्य गल्छी-4 येथील मास्टर गावात आहे. काही आरोपी गल्छी-6 येथील आदमघाट आणि सिद्धलेक-7 येथील आदमटार येथील रहिवासी आहेत. याशिवाय चितवन आणि पर्सा येथील काही लोकांचाही यामध्ये समावेश आहे, जे सध्या धादिंगमध्ये राहत होते. पोलिसांनी जप्त केलेली रोख रक्कम नेमकी कोणत्या बँकेची आहे, तसेच या घटनेत आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू केला आहे.

Nepal Flood
CM Vijay Thalapathy : अचानक तुरुंगात का गेले मुख्यमंत्री विजय थलपती? कैद्यांना भेटून म्हणाले..

महिलेच्या मृतदेहावरील सोन्याचे दागिनेही चोरले

या आपत्तीच्या काळात माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना नारायणी नदीजवळ समोर आली आहे. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका मृत महिलेच्या मृतदेहातून दोन व्यक्तींनी सोन्याच्या बाळ्या काढून घेतल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली.

नेपाळमध्ये पुरामुळे आतापर्यंत 626 जणांचा मृत्यू

नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) शनिवारी आकडेवारी अपडेट केली. त्यानुसार, नेपाळमध्ये आलेल्या या भीषण आपत्तीमध्ये आतापर्यंत 626 जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, बेपत्ता व्यक्तींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत 1,924 जण बेपत्ता असल्याची माहिती होती. मात्र, शनिवारी हा आकडा वाढून 2,426 वर पोहोचला आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये 517 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. पुरामुळे प्रभावित झालेल्या भागांमध्ये मदत आणि बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news