मल्याळम इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाच्या आरोपावर Prithviraj Sukumaran म्हणाला..
पुढारी ऑनलाईन डेस्क : हेमा कमिटीच्या रिपोर्ट (Hema Committee Report) नंतर मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांवर आरोप लागले आहेत. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) ने मोठे वक्तव्य केले आहे. AMMA च्या मौनावर देखील सवाल उपस्थित केले आहेत.
कोलकाता महिला डॉक्टर सोबत अत्याचार आणि हत्येदरम्यान, देशात हेमा कमिटी रिपोर्ट (Hema Committee Report) चर्चेत आहे. केरळ सरकारकडून आयटीआरच्या माध्यमातून जारी केलेल्या जस्टिस हेमा कमिटी रिपोर्टमध्ये मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीवर लैंगिक शोषण आणि कास्टिंग काउचसारखे गंभीर आरोप लागले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, पृथ्वीराज सुकुमारनने आपल्या फुटबॉल क्लब फोर्का कोच्चि एच.सी. लॉन्च इव्हेंटमध्ये हेमा कमिटी रिपोर्टविषयी बातचीत केली. ते मॉलीवूडमध्ये महिला कलाकारांसाठी सुरक्षेची मागणी करण्याऱ्या अभिनेत्यांमध्ये समाविष्ट आहे. त्याने पीडितांच्या तक्रारींची योग्यपणे दखल न घेतल्याने असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट्स (AMMA-मल्याळम चित्रपट कलाकारांचा संघ) वर टीका केली.
पृथ्वीराज सुकुमारनने केली कारवाईची मागणी
सालार अभिनेता पृथ्वीराज म्हणाला, "रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या निष्कर्षांनंतर खूप गंभीरतेने घेतले पाहिजे. लैंगिक शोषण करणाऱ्यांना शिक्षा मिळणे खूप गरजेचे आहे. गरजेचे हे आहे की, संपूर्ण इंडस्ट्रीचे लोक सुरक्षित असतील."
मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीत आहे पॉवरफुल ग्रुप?
हेमा कमिटी रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, काही दिग्दर्शक, अभिनेते - निर्मात्यांचा एक ग्रुप मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीला कंट्रोल करत आहे. पृथ्वीराजने देखील या गोष्टीला नकार दिला नाही. तो म्हणाला, "मी या गोष्टीचा सामना केला नाही. याचा अर्थ हा नाही की, चित्रपट इंडस्ट्रीमध्ये कोणताही प्रभावशाली ग्रुप नाहीये. जर कलाकारांवर बॅन लावण्यासाठी यासारखी संघटित ग्रुप सुरु असेल, तर नक्की कारवाई व्हायला पाहिजे."
मल्याळम इंडस्ट्रीतील 'या' अभिनेत्यांनी दिला राजीनामा
जेव्हापासून हेमा कमिटी रिपोर्ट समोर आला आहे, अनेक अभिनेत्रींनी दिग्गजांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. असोसिएशन ऑफ मल्याळम मूवी आर्टिस्ट्स (AMMA) के जॉईंट सेक्रेटरी बाबूराजवर एक ज्युनिअर आर्टिस्ट लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याआधी रंजीत आणि सिद्दीकीवर देखील गंभीर आरोप लागले. सिद्दीकीने मल्याळम चित्रपट कलाकार संघ (एएमएमए)चा राजीनामा दिला आहे. तसेच आरोप करणारी अभिनेत्री रेवती संपत विरोधात पोलिसात तक्रार दाखल आहे.

