

Happy Birthday Priyanka Chopra net worth car collection lavish life
मुंबई - बॉलिवूडमधून प्रवास करत 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राने आज जगभरात नाव तर कमावलेच आहे. पण तिचा हा निरंतर प्रवास हॉलिवूड दिवा बनण्यापर्यंत पोहोचलाय. अनेक चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्म, जाहिरातीत, ब्रँड्सशी जोडली जाऊन तिने आपल्या करिअर भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. आज ती १८ जुलै रोजी ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. 'देसी गर्ल'ने प्रियांकाने कोटींचे साम्राज्य कसे उभारले? जाणून घ्या तिची संपत्ती आहे तरी किती?
प्रियांकाचा जन्म १८ जुलै, १९८२ रोजी जमशेदपूर येथे झाला. लखनऊमध्ये ला मार्टिनियर गर्ल्स स्कूल, बरेलीत सेंट मारिया गोरेट्टी कॉलेज आणि जॉन एफ कॅनेडी हायस्कूल इन सीडर रॅपिड्स तसेच लोवा आर्मी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे.
पुढे ती मुंबईत जय हिन्द कॉलेज अँड बसंत सिंह इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून शिक्षण घेतले. पण ती पूर्ण शिक्षण घेऊ शकली नाही. मॉडलिंग करिअरमध्ये ॲक्टिव्ह असल्याने तिने शिक्षण अर्धवट सोडले होते. प्रियांकाला अभिनेत्री बनायचे नव्हते. तिला क्रिमिनल सायकोलॉजिस्ट किंवा एअरोनॉटिकल इंजीनियर बनायचं होतं. पण मॉडेलिंगमधून पुढे जात असताना तिने २००२ मध्ये ‘थमिजहन’मधून कलाविश्वात पदार्पण केले होते. २००३ मध्ये तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.
तिने २००० मध्ये मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केला होता.
'अंदाज', 'मुझसे शादी करोगी?' 'अग्निपथ', 'बर्फी', 'कमीने', 'दोस्ताना', 'डॉन २', 'क्रिश 3', 'बाजीराव मस्तानी', 'द स्काय इज पिंक', 'मैरी कॉम' यासारखे चित्रपट तिच्या नावावर आहेत.
बॉलिवूडनंतर ती हॉलिवूड कडे वळली. टीव्ही शो 'क्वांटिको'मध्ये मुख्य भूमिका तिने साकारली होती. 'बेवॉच', 'इजंट इट रोमँटिक', 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स', 'लव अगेन', 'द व्हाईट टायगर', 'द ब्लफ', 'हेड्स ऑफ स्टेट', 'सिटाडेल' सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. इतकचं नाही तर तिने 'इन माय सिटी' गाण्यातून तिने आपली प्रतिमा आणखी दृढ केली. 'एक्जॉटिक' आणि 'आय कांट मेक यू लव्ह मी' यासारखी तिची गाणी पसंतीस उतरली.
प्रियांका चोप्राची संपत्ती अंदाजे ५८३ कोटी रुपये आहे. एक अभिनेत्री, निर्माती आणि कंपनी गुंतवणूकदार म्हणून तिच्या लक्झरी लाईफवर नजर टाकुया.
प्रियंका तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी ३०-४० कोटी रुपये घेते. एस एस राजमौलीच्या SSMB29 या आगामी चित्रपटासाठी प्रियांकाने तगडी रक्कम घेतल्याचे माहिती आहे. रिपोर्टनुसार, तिने ३० कोटी फी घेतली असून महेश बाबू सोबत मुख्य भूमिकेत असेल.
गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये तिचे कोणतेही हिट चित्रपट नसले तरी 'सिटाडेल' आणि 'हेड्स ऑफ स्टेट' च्या माध्यमातून तिने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. इतकेच नाही तर तिने दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलीय. तिच्याकडे dating app Bumble मध्ये देखील हिस्सेदारी आहे. तिचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे पर्पल पेबल पिक्चर्स. ऑस्कर-नामांकित द व्हाईट टायगरची निर्मिती याच प्रोडक्शन हाऊसने केली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रियंका आणि निक जोनासची एकत्रित एकूण संपत्ती १२५० कोटी रुपये आहे. त्यामध्ये निकची ६६६ कोटी रुपयांची स्वत:ची संपत्ती आहे. दोघांच्या रिअल इस्टेट गुंतवणुकीत लॉस एंजेलिसमध्ये बंगला आहे, जो १७० कोटींचा आहे. लंडन आणि भारतात फ्लॅट्स आहेत.
लक्झरी-किंमतीच्या ब्रँड एंडोर्समेंट्समधून तिची ६२० कोटी निव्वळ संपत्ती आहे. तिचे ९२.४ दशलक्ष सोशल मीडिया फॉलोअर्स असून त्यातून येणारे कमाईही अधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्टारडम मिळवताना प्रियांका अनेक व्यवसाय, जाहिराती, ब्रँड्सशी जोडली गेलीय.
Mercedes Maybach S650, Rolls Royce Ghost, Mercedes Benz S-Class, BMW 7-Series, Audi Q7, Chevrolet Suburban, Mercedes Maybach S 560, Polaris General XP 4 1000 Deluxe असे कार कलेक्शन तिच्याकडे आहे.
हॉलिवूड प्रोजक्ट, बॉलिवूड रॉयल्टी शिवाय अनेक व्यावसायिक उपक्रम, सौंदर्य ब्रँड Anomalie, सोना रेस्टॉरंट.
रिपोर्टनुसार, भारतात सर्वाधिक कर भरणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक मानली जाते. २०२४ मध्ये तिने ७ कोटी रुपयांचा कर भरला आहे.