Vijay Sethupathi ने आयुष्यभर 'या' दिग्दर्शकासोबत काम न करण्याचा घेतला निर्णय; पण एकाच क्षणात बदलले सर्वकाही...

विजय सेतुपतिने आयुष्यभर 'या' दिग्दर्शकासोबत काम न करण्याचा घेतला निर्णय; पण एकाच क्षणात बदलले सर्वकाही
image of Vijay Sethupathi
south actor Vijay Sethupathi Instagram
Published on
Updated on

Vijay Sethupathi and national winning awarded director pandiraj met again

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक पंडिराज आणि साऊथ अभिनेता विजय सेतुपति यांच्यात मतभेद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. परिणामी, दोघांनीही परस्पर सहमतीने आयुष्यभर एकमेकांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. आगामी कौटुंबिक चित्रपट थलाइवन थलाइवीमध्ये अभिनेता विजय सेतुपति आणि नित्या मेनन मुख्य भूमिकेत आहे. पण आता पंडिराज आणि विजय सेतुपति यांनी खुलासा केला आहे की, कशा प्रकारे या चित्रपटाच्या आधी मतभेद झाल्याने दोघांनी जीवनभर सोबत काम करण्याचा मोठा निर्णय घेतला होता.

पंडिराज राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. थलाइवन थलाइवीच्या प्री-रिलीज कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, आधी आमच्या विचारांमध्ये खूप मतभेद होते. पण, कशा प्रकारे ते पुन्हा एकत्र आले आणि एकमेकांप्रती असलेले मतभेद दूर करत चित्रपटात एकत्र आले.

image of Vijay Sethupathi
War 2 | YRF ने 'वॉर 2' चे दमदार पोस्टर केले लॉन्च, हृतिक-ज्यु. एनटीआरच्या चित्रपटाची फॅन्सना प्रतीक्षा
image of director Pandiraj
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक पंडिराज Instagram
image of Vijay Sethupathi
Who is Raju Kalakar | सोनू निगमसोबत गाणारा राजू कलाकार कोण आहे?

मिस्किन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत पुन्हा भेट 

"काही दिवसांपूर्वी आमच्यात थोडे वैचारिक मतभेद झाले होते. पुढे हे मतभेद वाढले. पण नंतर आम्ही दोघांनी एकमेकांच्या सहमतीने ठरवलं की, सोबत काम करायचं नाही. पण, दिग्दर्शक मिस्किन यांच्या एका वाढदिवसाच्या पार्टीत सर्व मतभेद मिटले. पंडिराज म्हमाले, सेतुपति येताना मी पाहिलं. मला वाटलं की, त्याला अभिवादन करायला हवं की दूर राहायला हवं. मग मिस्किन यांनी सर्वांना एकत्र केक कापण्यासाठी बोलावलं. मला वाटलं की सेतुपति माझ्याकडे पाहणार नाही. पण दुसऱ्याच क्षणी त्याचा हात माझ्या खांद्यावर होता. आणि तो मला आलिंगन देत होता. तो म्हणाला, 'आपण एकत्र एखादा चित्रपट करुया का? त्याचवेळी आमचे सर्व मतभेद संपले."

image of Nithya Menen
Nithya Menen upcoming film with vijay sethupathi Instagram

जाणून घ्या अभिनेत्री नित्या मेननच्या आगामी चित्रपटाविषयी

  • चित्रपट थलाइवन थलाइवीमध्ये विजय सेतुपतिसोबत नित्या मेनन झळकणार आहे

  • नित्या मेननला 'तिरुचित्रम्बलम' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.

  • 'तिरुचित्रम्बलम'मध्ये नित्या सोबत अभिनेता धनुष होता

  • केवळ तमिळ प्रेक्षकच नाही तर मल्याळम प्रेक्षक देखील या चित्रपटाच्या प्रेमात पडले होते

  • तसेच इडली कढाई नावाच्या चित्रपटातही नित्या मेनन आणि धनुष पुन्हा एकत्र दिसले होते

  • अरुण विजय, शालिनी पांडे, सत्यराज, पार्थिपन आणि समुथिरकानी या कलाकारांच्याही भूमिका यात होत्या

  • संगीत जी. वी. प्रकाश कुमार यांनी दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news