पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मिर्जापूर सीजन ३'चा बोनस एपिसोड रिलीज झाला आहे. पण हा एपिसोड पाहिल्यानंतर राग येऊ शकतो. लोकांनी आपली कामे सोडून बोनस एपिसोड पाहिले. पण अनेक रिव्ह्यू समोर आल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही. अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर अनेक युजर्सनी शेवटी नाराजी पदरात पडल्याची प्रतिक्रिया समोर येत आहेत.
जेव्हा ‘मिर्जापूर सीजन ३’ रिलीज झाला होता, तेव्हा फॅन्सच्या अपेक्षा भंग झाल्या. कारण एपिसोडमध्ये काही खास कहाणी नव्हतीच. मुन्ना भैय्याचा स्वॅग गायब होता. गुड्डू भैया कोणत्या नशेत होता, हे कुणालाही समजले नाही. संपूर्ण सीजन छोटे आणि गोलूच्या मध्ये प्रेम आणि द्वेष दर्शवताना निघून गेला आहे. सर्व क्रेडिट सलोनी भाभी आपले ग्लॅमर दाखवून घेऊन गेली. अखेरला ॲक्शन आणि अहिंसा दिसते. पण, फॅन्सच्या पदरात निराशाच पडलीय.
मुन्ना भैय्याने प्रोमोमध्ये वातावरण तयार केलं की, तो फॅन्ससाठी पुन्हा वापसी करत आहेत. आता बोनस एपिसोड आला आहे, मुन्ना भैयाची वापसी झालेली नाही. तर तो फक्त एपिसोडमध्ये अँकरिंग करताना दिसतो. २५ मिनिटांच्या या एपिसोडमध्ये सीरीजमधील डिलीट केलेले सीन्स आहेत.
काही नेटकऱ्यांनी रिव्ह्यू दिले आहेत. काही जण म्हणाले की, जो सीन पहिल्यांदा बेकार समजून निर्मात्यांनी हटवले होते, आता ते जोडून मुन्ना भैय्याच्या कॉमेंट्रीसोबत जोडले गेले आहेत. आता फालतू सीन्स दाखवून व्ह्यूज मिळवण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.