

Bill Gates Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2
पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्लसवरील प्रसिद्ध डेली सोप 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'ने पुन्हा एकदा टेलिव्हिजन पडद्यावर कब्जा केला आहे. या मालिकेचा दुसरा सीजन तुफान लोकप्रिय होत आहे. आकर्षक कथानक आणि अनपेक्षित ट्विस्टने भरलेल्या या शोने खिळवून ठेवले आहे.
आता या शोच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स पहिल्यांदाच भारतीय टेलिव्हिजनवर दिसणार आहेत. आयकॉनिक 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'! लोकप्रिय डेली सोपच्या रीलाँचमध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स एक दुर्मिळ कॅमिओ भूमिका साकारणार आहेत.
बिल गेट्स 'जय श्री कृष्ण'सह करणार मालिकेत प्रवेश
बिल गेट्स भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच हजेरी लावत आहेत तेही आयकॉनिक 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय डेली सोपमध्ये !
नवीन प्रोमो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये गेट्स हिंदी बोलत असताना ते स्मृती इराणी यांनी साकारलेल्या तुलसी विराणीसोबत व्हिडिओ चॅटवर बोलत असतात. यामध्ये ते म्हणतात की, जय श्री कृष्ण तुलसी जी", ज्यावर तुलसी उत्तर देते, "बहुत अच्छा लगा आप अमेरिका से जुड रहे है हमारे परिवार से। आपका हम बेसबरी से इंतजार कर रहे हैं."
यावर काय म्हणाले नेटिझन्स ?
प्रोमोवर नेटिझन्सनी त्वरित प्रतिक्रिया दिल्या. एकाने लिहिले, "वाह!! तुलसी आणि बिल गेट्स एकाच उद्देशाने - हा एक शक्तिशाली संयोजन आहे! पिढ्यांना जोडणारा संदेश - आरोग्य, सहानुभूती आणि बदल. खूप अभिमानास्पद! दशकांनंतरही आणि अजूनही हृदयांवर राज्य करत आहे. दुस-याने लिहिले की, एका "वजन वाढवणाऱ्या महिलेच्या खऱ्या संघर्षांचे चित्रण करण्यापासून ते मुलांचे संगोपन आणि मानसिकता, पतीचे कठोर शब्द आणि जे योग्य आहे त्यासाठी भूमिका घेण्याचे धाडस दाखवण्यापर्यंत... प्रत्येक गोष्ट शक्तिशाली आणि संबंधित वाटते.
एकाने लिहिले , क्यूंकी सास भी कभी बहू थी चा हा सीझन केवळ वारशाचाच एक भाग नाही; हे महत्त्वाकांक्षा, जागतिक प्रासंगिकता आणि टेलिव्हिजन अजूनही आपल्याला सर्वोत्तम मार्गांनी कसे आश्चर्यचकित करू शकते याबद्दल एक धाडसी उदाहरण आहे. अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया या प्रोमोवर येत आहेत. या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत.