

पुढारी ऑनलाईन डेस्क - बिग बॉस १८ मध्ये सुरुवातीलाच दोन ग्रुप दिसले. एका ग्रुपमध्ये विवियन डीसेना, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि एलिस कौशिक होते. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये करणवीर मेहरा, चुम दरांग, श्रुतिका राज आणि शिल्पा शिरोडकर होते. विवियन डीसेना का ग्रुपमध्ये आहे. पण करणवीर मेहराचा ग्रुप जवळपास तुटला आहे.
बिग बॉस १८ मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. जेव्हा शिल्पा शिरोडकर आणि श्रुतिका राजने तिचा मित्र करणवीर मेहरा आणि चुम दरांगची साथ सोडून विवियन डीसेनाच्या टीम सोबत हात मिळवणी केली. खरंतर रोहित शेट्टीच्या ‘वीकेंड का वार’ मध्ये शिल्पा- श्रुतिकाची कृत्ये पाहून रजत दलालने आधीपासूनच अंदाज लावला होता की, लवकरच ते दोघे विवियन डीसेनाच्या ग्रुपमध्ये सहभागी होईल. त्यांचा हा अंदाज तेव्हा खरा ठरला जेव्हा नॉमिनेशन टास्कच्या दरम्यान शिल्पा आणि श्रुतिका तिचे मित्र करणवीर - चुम यांची साथ सोडून विवियन डीसेना, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि एलिस कौशिकच्या ग्रुपमध्ये सामील झाली.
जेव्हा करणवीर मेहरा आणि चुम दरांगने श्रुतिकाला यामीगील कारण विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, शिल्पा शिरोडकरमुळे ते हा ग्रुप सोडत आहे. ती म्हणाली, करणवीर मेहरा आणि चुम दरांगवर ओरडताना म्हटले की, ''जेव्हा शिल्पा शिरोडकर माझा अपमान करते. तेव्हा माझे दोन मित्र न बोलता मजा घेतात. तुम्हाला जर शिल्पा शिरोडकरशी इतकं प्रेम आहे तर यापुढे माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका क, कठीण प्रसंगात मी तुमचा साथ देईन.''