

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्रा परिणीती चोप्रा आणि तिचे पती आप खासदार राघव चड्ढा दोघेही वाराणसी पोहोचले. या कपलने गंगा आरतीमध्ये भाग घेतला. यावेळता व्हिडिओ व्हायरल झाला असून तो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. (Parineeti Chopra Raghav Chadha) पण दुसरीकडे त्यांना ट्रोल केलं जात आहे. (Parineeti Chopra Raghav Chadha)
परिणीती -राघव चड्ढा १० नोव्हेंबर रविवारीला वाराणसी पोहोचले. तिथे दोघांनी गंगा आरती केली. दशाश्वमेध घाट पोहोचून धार्मिक वातावरणात मग्न झालेले दिसले. सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यांचे फॅन्स या कपलचे कौतुक करत आहेत. तर काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे.
कपलसोबत राघव यांची आई आणि परिवारातील बाकी लोकदेखील पोहोचले होते. परिणीतीने पोपटी रंगाचा सूट परिधान केली होता तर राघव यांनी पांढरा कुर्ता-पायजामा परिधान केला होता. परिणीती - राघवचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आनेकांनी त्यांना विराट -अनुष्काची कॉपी केल्याचे म्हटले आहे.
video-viralbhayani insta वरून साभार