

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सलीम खान, कपिल शर्मा यांसह अनेकांनी भावूक श्रद्धांजली वाहिली. धर्मेंद्र यांचे जाणे म्हणजे चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत आहे.
narendra modi salim khan kapil sharma reactions on dharmendra death
पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूडचे एव्हरग्रीन सुपरस्टार आणि लाखो चाहत्यांच्या हृदयात घर करणारे धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीतील या अमूल्य व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. राजकारणापासून ते मनोरंजनविश्वापर्यंत अनेक दिग्गजांनी धर्मेंद्रच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्स अकाऊंटवर दुःख व्यक्त केले.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व होते, एक असाधारण अभिनेता होते ज्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेत आकर्षण आणलs. त्यांनी ज्या पद्धतीने विविध भूमिका साकारल्या त्या असंख्य लोकांच्या मनाला स्पर्शून गेल्या होत्या. धर्मेंद्रजी त्यांच्या साधेपणा, नम्रता आणि प्रेमळपणासाठी तितकेच प्रशंसनीय होते. या दुःखाच्या वेळी, माझ्या संवेदना आहेत.
सलीम खान
'धरमजी यांच्याशी माझे जुने असोसिएशन आहे, १९५८-५९ पासून. आम्ही दोघे एकत्र आलो होतो. आम्ही दोघांनी खूप संघर्ष पाहिला आहे आणि साऱ्या गोष्टी कॉमन देखील आहेत. ते एक अद्भूत व्यक्ती आहेत आणि जेव्हा देखील शोल चित्रपटात कुणाला घ्यायचं, हा विचार आला तेव्हा सर्वात पहिल्यांदा धरम जींचा विचार आला. ते आमच्यासाठी एका परिवारातील सदस्य आणि एका मोठ्या भावाप्रमाणे आहेत.'
कॉमेडियन कपिल शर्मा
धर्मेंद्र यांच्या जाण्याने कपिल खूप दु:खी आहे. त्याने भावूक करणारी पोस्ट फॅन्ससोबत शेअर केली आहे. त्याने म्हटलंय- 'असं वाटत आहे की, जसे की दुसऱ्यांदा वडिलांना गमावलो आहे.'
उर्मिला मातोंडकर
शब्दच कमी पडतात...सर्वांमध्ये सर्वात देखणा आणि सर्वात छान माणूस. एक दिग्गज स्टार झाल्यानंतरही तो इतका आकर्षक आणि करिष्माई असू शकतो. तुमची खूप आठवण येईल सर!! RIP #धर्मेंद्र तुमच्या प्रवेशाने स्वर्ग आणखी सुंदर होईल!! धरम जी, तुम्ही सुपरस्टार होता आणि बॉलीवूडच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुपरस्टार राहाल. #धर्मेंद्र देओल
करण जोहर
चित्रपट निर्माता करण जोहरने इन्स्टा स्टोरीवर पोस्ट करून संवेदना व्यक्त केल्या