.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क - बिग बॉसच्या घरात काही दिवसांपूर्वी अभिनेत्री निक्की तंबोली आणि धनंजय पोवार (डीपी) दोघेही एका ताटात जेवताना दिसले. यावेळी निक्की हातात ताट घेऊन जेवते तर तिच्या ताटामध्ये डीपीदेखील जेवताना दिसत होता. या व्हिडिओवर आता डीपीच्या बायकोची प्रतिक्रिया आलीय. इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ती यामध्ये काय म्हणते पाहुया.
डीपीची बायको म्हणाली- ''हा बघायले मी...ती हिरोईनी ताट घेऊन उभारली असल तुमच्यासमोर मी ताट घेऊन भरवत बसतोय तुम्हाला..हे लायसन्स सात जन्मीचं हाय...''
बिग बॉसच्या गराता निक्की आणि धनंजय पोवार (डीपी) ची कॉमेडी सुरु असते. त्याचवेळी डीपी आपल्या बायकोला म्हणतो बघ एवढी मोठी हिरोईन माझ्यासाठी ताट घेऊन बसलीय. आणि तू बघ...बिग बॉस तुम्ही पाहू शकता, जिने २ हिंदी चित्रपट आणि ३ साऊथ चित्रपट केले आहेत, अशी हिरोईन माझे ताट घेऊन उभा राहिली आहे. डीपी म्हणतो- ''माझ्यासारखा राजा मिळणं अशक्य आहे. हे जे राज्य आणि गोड प्रजा मला दिलीय...आज लिपस्टीक लावलेली नाही, विषय कट. यावर निक्की म्हणते - मी लावलेली आहे लिपस्टीक. त्यावर डीपीची प्रतिक्रिया येते की-मला वाटलं नॅच्युरल आहे. देवा...''
डीपीच्या बायकोचा हा व्हिडिओ Dhananjay Powar या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तो व्हिडिओ व्हायरल होतानाही दिसत आहे.