

पुढारी ऑनलाईन डेस्क - बिग बॉसच्या घरात अभिनेत्री निक्की तंबोली आणि धनंजय पवार (डीपी) यांच्यात कॉमेडी सुरु आहे. व्हिडिओमध्ये दोघेही जेवताना दिसत आहेत. यावेळी निक्की हातात ताट घेऊन जेवताना दिसत आहे. तिच्या ताटामध्ये डीपी खाताना दिसत आहे. जेवत जेवत दोघे कॉमेडी करताना दिसत आहेत. त्याचवेळी डीपी आपल्या बायकोला म्हणतो बघ एवढी मोठी हिरोईन माझ्यासाठी ताट घेऊन बसलीय. आणि तू बघ...डीपीच्या या कॉमेडीमध्ये नेमकं काय घडलं आहे, पाहुया.
बिग बॉस तुम्ही पाहू शकता, जिने २ हिंदी चित्रपट आणि ३ साऊथ चित्रपट केले आहेत, अशी हिरोईन माझे ताट घेऊन उभा राहिली आहे. डीपी म्हणतो- ''माझ्यासारखा राजा मिळणं अशक्य आहे. हे जे राज्य आणि गोड प्रजा मला दिलीय...आज लिपस्टीक लावलेली नाही, विषय कट. यावर निक्की म्हणते-मी लावलेली आहे लिपस्टीक. त्यावर डीपीची प्रतिक्रिया येते की-मला वाटलं नॅच्युरल आहे. देवा...''
निक्की सांगते की- बिग बॉस कसे म्हटले बाई...'' त्यावर डीपी म्हणतो- ''आज माझी बायको जर हे बघत असेल तर तू बघ सतत मला जेवायला देत असताना कशी म्हणते घे की, ये खा की...खा की म्हणत असते. आणि इथे बघ मला हिरोईन खावा की म्हणतेय. माझं ताट घेऊन उभी राहिलीय.''