.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीअभिनेत्री सना मकबूलने रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी सीजन ३' जिंकला. २ ऑगस्टला, शुक्रवारी ग्रँड फिनालेमध्ये होस्ट अनिल कपूरने सनाला विजेता घोषित केले. ट्रॉफीसोबत सनाने २५ लाख रुपयांची प्राईज मनीदेखील जिंकली. तर रॅपर नेजी उपविजयी ठरला. रणवीर शौरी, साई केतन राव आणि कृतिका मलिक देखील या स्पर्धेत होते. Bigg Boss OTT 3 मध्ये Sana Makbul ला सुरुवातीपासून ऐकण्यात आलं की, ती इथे ट्रॉफी जिंकण्यासाठी आली आहे. यासाठी ती काहीही करू शकते. अखेरीस तिने शो जिंकलाच.
बिग बॉसमध्ये तिचा हा ॲटिट्यूड प्रेक्षकांना देखील आवडला. या प्रवासात तिने अनक मित्रदेखील बनवले आणि नातीदेखील जपली. ग्रँड फिनालेमध्ये टॉप-5 मधून तीन कंटेस्टेंट्स रणवीर शौरी, साई केतन राव आणि कृतिका मलिक बेघर झाल्यानंतर बिग बॉसने १० मिनिटांसाठी वोटिंग लाईन सुरु केली होती. प्रेक्षकांनी या कालावधीत आपल्या आवडत्या सदस्याला मते दिली. सनाने सर्वाधिक मते मिळवली. संपूर्ण सीजनमध्ये सना मकबूल आणि रॅपर नेजीची मैत्री झाली. असे काही प्रसंग आले की, नेजी केवळ सनाचे ऐकत होता, त्यामुळे त्यांची मैत्री टिकून राहिली.
याशिवाय ग्रँड फिनालेमध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरने त्यांचा चित्रपट 'स्त्री २' चे प्रमोशन देखील केले. विशाल पांडे आणि अरमान मलिक यांच्यात 'थप्पड कांड' वरून वाद देखील झाला.