

Bigg Boss Marathi 6 मध्ये चोरीच्या आरोपामुळे अभिनेत्री तन्वीचा संताप अनावर झाला. कोणताही ठोस पुरावा नसताना आपल्यावर आरोप करण्यात आल्याने ती भावनिक झाली आणि “असेच वागवले जाणार असेल तर हा शो मला करायचा नाही,” असे तिने ठामपणे सांगितले. या घटनेमुळे घरात मोठा वाद निर्माण झाला असून प्रेक्षकांमध्येही चर्चांना उधाण आले आहे.
Bigg Boss Marathi 6 updates
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन ६ च्या घरात दीपाली आणि रुचितामध्ये जुंपलयानंतर आता तन्वी घरामध्ये भडकलेली दिसतेय. तिचा एक नवा व्हिडिओ कलर्स मराठीने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्या व्हिडिओमध्ये तिचा रागाचा पारा चढलेला दिसतो आहे.
का टास्कदरम्यान घरातील काही वस्तू गायब झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या घटनेनंतर काही स्पर्धकांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संशयाची सुई तन्वीच्या दिशेने वळवली. कोणताही ठोस पुरावा नसताना आपल्यावर चोरीचा आरोप होत असल्याचे लक्षात येताच तन्वी भावनिक झाली आणि तिने आपला संताप उघडपणे व्यक्त केला.
नेमकं काय घडतंय?
आता ही ओरडणार, सगळं स्वत:वर घेणार आणि रडणार.. या वाक्यानंतर घरातील स्पर्धक तन्वी कोलते संतापली आणि म्हणते- 'मी चोरी करत होते आट्याची. ते आमचं होतं म्हणून मी ते लपवत होते. नाही माझ्यावर आलं की मी खूप हायपर होते. तर हा मला शो करायचा नाही. सारखे सारखे जर माझ्यावर आरोप येत असतील तर, इथे चोरीचा टॅग घ्यायला आले मी..मी चोरीमध्ये कुठेच नसते. मी ऑन कॅमेरा आट्य़ाची चोरी करत होते..'
तन्वीच्या या बोलण्यानंतर आता पुढे काय घडणार? तिचा राग शांत होणार का, बिग बॉस तिच्याबद्दल काय निर्णय घेणार, हे पाहणे रंजक ठरेल.
दरम्यान, करणच्या गेमवरून घरातील सदस्यांमध्ये चर्चा होताना दिसतेय. अनुश्री माने म्हणते-''यावेळी करण नाहीये नॉमिनेट. कधी कधी त्याच्या हातात असतं काहीतरी ..त्याला विचारलं अरे तू हे काय करत आहेस.. तर तो म्हणतो-हा माझा गेम आहे..हे मी आता करणार नाही..अजून पुढच्या आठवड्यात. अनुश्री म्हणते-एक तर तो खूप इनोसेंट आहे. त्याला वेगळं काही तरी करायचं असतं. पण तो गेम खेळता खेळता चुकतो.''
राकेश आणि रुचिता यांच्यात जुंपलं
एका नव्या प्रोमोमध्ये राकेश आणि रुचिता एकमेकांना भिडल होते. ‘बिग बॉस’ने दिलेल्या टास्कदरम्यान त्यांच्यात भांडण लागलं आणि घरात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालं.
शाब्दिक वादापासून मोठ्या भांडणाला सुरुवात होताना दिसत आहे. आता त्यांचे भांडण आणखी टोकाला जाणार आहे. राकेशचा आक्रमकपणा आणि रुचिताचे कडक प्रत्युत्तर, अखेर वाद कोणत्या टोकाला जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.